कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये रेल्वे अपघात झाला. अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसचे 15 डब्बे रुळावरुन घसरले. अपघातात सुमारे 48 प्रवासी जखमी झाले आहेत. कानपूरच्या रुरामध्ये हा अपघात झाला.


आज पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर दिल्ली-हावडा मार्ग ठप्प झाला आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या जनसंपर्क अधिकारी अनिल सक्सेना यांच्या माहितीनुसार, सुरुवातीचे 6 डब्बे रुळावर आहे. त्यानंतरचे 7 डब्ब्यापासून 20 डब्बे रुळावरुन उतरले आहेत. रेल्वेचं मदत आणि बचावकार्य सुरु आहे. या अपघातानंतर काही ट्रेनवर परिणाम झाला आहे.

अपघातात 48 प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे, असं उत्तर प्रदेशचे महासंचालक जावेद अहमद यांनी सांगितलं.

मी स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं आहे, असं ट्वीट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अपघातानंतर केलं.

https://twitter.com/sureshpprabhu/status/813931462944620544
अपघातानंतर रेल्वेने हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.

https://twitter.com/RailMinIndia/status/813936012946608129

मागील महिन्यात कानपूरमध्येच रेल्वे अपघात

दरम्यान, मागील महिन्यात कानपूरमध्येच रेल्वे अपघात झाला होता. अपघातात पाटणा-इंदूर इंटरसिटी गाडीचे 14 डब्बे रुळावरुन घसरले होते. ही ट्रेन इंदूरवरुन पाटणाला जात होती. पोखरायामध्ये पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 140 जणांचा मृत्यू झाला होता.