मुंबई: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितलं की, "कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारीला 400 ग्रॅम मेफेड्रॉन (MD) बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे."


NCB ने सांगितलं की, "या प्रकरणी अधिक तपास करताना त्यांना सईद शेख नावाच्या एका ड्रग सप्लायरची माहिती मिळाली." 25 वर्षीय सईद शेख मीरारोड परिसरातून आपला ड्रग्जचा व्यापार करतो अशीही माहिती NCB ला मिळाली होती. त्याचा माग घेताना एनसीबीने मीरा रोड परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकला असताना त्या ठिकाणी कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारी रंगेहाथ सापडली. तिच्याकडून 400 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं. त्यानंतर श्वेता कुमारीला NCB ने अटक केली असून तिची अधिक चौकशी करण्यात येत आहे.


महाराष्ट्र आणि गोव्यातील ड्रग्ज सप्लायच्या चेनचा तपास करताना 2 जानेवारीला मीरा रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी कन्नड अभिनेत्री श्वेता कुमारी रंगेहाथ सापडली. NCB ने तिच्यावर नार्कोटिक ड्रग्ज अॅन्ड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस अॅक्ट (NDPS) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण चव्हाट्यावर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत NCB ने त्या संबंधी अनेकांना अटक केली आहे. याच प्रकरणात सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावालाही NCB ने अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी या दोघांनाही जामीन मिळाला होता.


बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात NCB ने आतापर्यंत दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि अर्जुन रामपाल यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली आहे.


संबंधित बातम्या: