मुंबई: ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या NCB ने बॉलिवूड निर्माता करण जोहरशी संबंधित काही लोकांना गुरुवारी समन्स बजावलं होतं. त्याला आता करण जोहरनं उत्तर दिलंय. करण जोहरच्या वतीनं त्याचे वकील राघव गुप्ता NCB च्या कार्यालयात उपस्थित राहिले आणि त्यांनी करण जोहरची भूमिका मांडली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर NCB बॉलिवूड मध्ये पसरलेल्या ड्रग्ज जाळ्याचा तपास करत आहे. त्यामध्ये NCB ने आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे आणि अनेकांना अटकही केली आहे. गुरुवारी NCB ने करण जोहरशी संबंधित काही लोकांना समन्स पाठवलं होतं. करण जोहरने याबाबत वकीलांमार्फत आपलं म्हणनं मांडलं असून त्यावर NCB चे समाधान झालं नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
काय आहे प्रकरण?
NCB च्या या समन्समुळं करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. NCB ने करण जोहरकडून 2019 सालच्या एका व्हायरल व्हिडिओ संदर्भात माहिती मागितली होती. 2019 साली करण जोहरच्या घरी एक पार्टी झाली होती. त्यात दिपिका पादुकोन, अर्जुन कपूर, विकी कौशल, वरुण धवन, रणबीर कपूर, मलाइका अरोरा आणि इतर अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. नंतर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
करण जोहरच्या घरी झालेल्या या पार्टीची तक्रार शिरोमणी अकाली दलाचे नेते मंजिंदर सिंह सिरसा यांनी NCB चे प्रमुख राकेश अस्थाना यांच्याकडे केली होती. करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीत ड्रग्जचे सेवन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी NCB कडे केली होती.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना करण जोहरने सांगितले होते की, "मी ड्रग्ज घेत नाही आणि त्याला प्रोत्साहदेखील देत नाही." या व्हायरल झालेल्या व्हिडिओबद्दल पसवण्यात आलेल्या अफवा या चुकीच्या असल्याचंही करण जोहरनं सांगितलं.
ड्रग्ज प्रकरणात NCB ने करण जोहरच्या मालकीच्या असलेल्या धर्मा प्रोडक्शनच्या माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला ताब्यात घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या: