Drugs Case प्रकरणात नाव गोवलं गेल्यामुळं अभिनेता अर्जुन रामपालच्या अडचणी येत्या दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याआधी Arjun Rampal अर्जुन चौकशीसाठी नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, अर्थात एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाला आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करत अर्जुनचं चौकशीसाठी जातानाचं छायाचित्रंही सर्वांपुढं आणलं.
ड्रग केस प्रकरणात नाव समोर आल्यामुळं अर्जुनला एनसीबीनं चौकशीसाठी बोलवल्याचं कळत आहे. यापूर्वी एनसीबीनं अर्जुनची प्रेयसी गॅब्रिएला आणि तिच्या भावाचीही चौकशी केली होती. ज्यानंतर त्याच्या पार्टनरच्या भावाला या प्रकरणात एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं.
गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियाओस डेमेट्रिएड्सने एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मदतीनंच बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं जाळं पसरवल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे. समोर आली आहे.
अर्जुनच्या घरावर एनसीबीचा छापा
काही दिवसांपूर्वीच अर्जुनच्या घरी एनसीबीनं छापा टाकत वांद्य्रातील त्याच्या घराची झडती घेतली होती. ज्यानंतर त्याच्या घरातून काही उपकरणं आणि औषधं जप्त करण्यात आली होती, ज्यांवर NDPS Act अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईनंतर त्याची जवळपास 7 तासांसाठी चौकशी करण्यात आली होती.
फक्त अर्जुनच नव्हे, तर त्याची प्रेयसी गॅब्रिएला हिचीही एनसीबीनं दोनदा चौकशी केली. गॅब्रिएलाच्या भावाचं या प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर या दोघांवरही संशयाची नजर आली असून, त्यांच्या चौकशीचा फेरा एनसीबीनं सुरु केला.
सुशांत सिंह राजपूत (Sushan singh rajput) आत्महत्या प्रकरणाला जोडून Drugs case चा तपास सुरु झाला होता
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच त्याला जोडूनच एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणाची चौकशीही सुरु केली. पाहता पाहता या प्रकरणात बी- टाऊनमधील अनेक बड्या सोलिब्रिटींची नावं आणि त्यांचं या विश्वाशी असणारं नातं धक्कादायकरित्या समोर आलं. आतापर्यंत या प्रकरणी कारवाई करतेवेळी एनसीबीनं जवळपास 28 जणांना ताब्यात घेतलं आहे. पुढं या चौकशी आणि तपासातून आणखी कोणत्या सेलिब्रिटींची नावं पुढे येतात आणि याची पाळंमुळं नेमकी कुठवर पसरली आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.