Delhi Girl Accident: दिल्लीच्या अंजलीचा अपघात झाला? की दिल्लीच्या अंजलीचा घात झाला? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या अपघाताबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतल्या कंझावला परिसरात झालेल्या भयानक अपघातामध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे...कारण या अपघातात मरण पावलेल्या अंजलीच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. आणि हा संशय व्यक्त झाला आहे. तो तीन वेगवेगळ्या सीसीटीव्हीमुळे....
पहिली दृश्ये आहेत...सोमवार दिनांक एक जानेवारी पहाटे तीन वाजून 34 मिनिटे... या दृश्यांमध्ये अंजलीचा देह हा कारखाली अडकलेला स्पष्ट दिसतोय...दुसरी दृश्ये आहेत...सोमवार दिनांक एक जानेवारी मध्यरात्री एक वाजून 31 मिनिटे या दृश्यांमध्ये अंजली आणि तिची मैत्रिण निधी यांच्यामध्ये भांडण होताना दिसतंय... भांडणानंतर या दोघी गाडीवरुन जाताना दिसत आहेत...निधी गाडी चालवतेय...तर अंजली मागे बसली आहे...पण या दृश्यांच्या पाचच मिनिटानंतर म्हणजे सोमवार दिनांक 1 जानेवारी मध्यरात्री 1 वाजून 36 मिनिटांनी निधी आपल्या घरी परतलेली दिसतेय...म्हणजे पहिल्या प्रयत्नात दरवाजा न उघडल्याने ती परत जाते...पण काही क्षणात परत येते आणि घरात जाते असं दृश्यांमध्ये दिसतंय...या तिन्ही सीसीटीव्हींवरुन अपघातानंतर निधी तातडीने घरी परतली हे स्पष्ट होतंय. खरं तर अंजली आणि तिची मैत्रिण या दोघींनी न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी ओयोमध्ये रुम बुक केली होती. 31 तारखेच्या रात्री 8 वाजता त्या दोघी या रुमवर गेल्या. आणि तिथे पार्टी केली. आणि पार्टी करुन घरी परतत असतानाच ही दुर्घटना झाली. आणि त्यात अंजलीचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेवर कालच निधीने पहिल्यांदा भाष्य केलं..
प्रश्न असा आहे...की अंजलीने मद्यप्रशान केले असेल, तर अंजलीच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मद्याचे अंश का सापडले नाहीत? जर अंजलीने मद्यप्राशन केले असेल तर ते मद्य हॉटेलमध्ये कोण घेऊन आलं? कारमधली मुले दारु प्यायली होती, हे निधीला कसं कळलं? कारशी धडक झाल्यानंतर निधी आपल्या घरी पोहोचली कशी? केवळ घाबरल्यानेच निधीने घटनास्थळावरुन पळ काढला का? हॉटेलची रुम अंजलीने बुक केली होती, तर मग निधीचं नाव रजिस्टरमध्ये का नव्हतं? रात्री 8 वाजता हॉटेलवर पोहोचल्यापासून रात्री दीडपर्यंत काय झालं? सीसीटीव्हीमध्ये अपघाताची वेळ साडे तीनची आहे... मग निधी दीड वाजताच घरी कशी परत आली? हेच सगळे सवाल विचारत अंजलीची हत्या झाली का? आणि त्या हत्येमध्ये निधीचाही सहभाग होता का? असा प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला आहे..अंजलीच्या पोस्टमार्टेममध्ये शरिरासोबत मेंदूच मिळाला नसल्याचं उघड झालंय...इतकंच नाही... तर तिच्या बरगड्याही छातीतून बाहेर आल्याचं निरीक्षण आहे...त्यामुळे ही सुनियोजित हत्याच असल्याचा आरोप अंजलीच्या कुटुंबियांनी केलाय...त्यामुळे पोलिसांनी आता हत्येच्या दिशेनेही तपास सुरु केला आहे