Delhi Girl Accident : दिल्लीतील कांजवाला येथील अंजलीच्या ( (Anjali Singh) ) अपघात प्रकरणी रोज नव-नवीन माहिती पुढे येत आहे. त्यातच या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. अपघातानंतर तिची एक मैत्रिण घटनास्थळावरून पळून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज अपघात स्थळापासून 150 मीटर अंतरावरील आहे. सीसीटीव्हीमध्ये पीडितेची मैत्रिण निधी अपघातानंतर तेथून पळताना दिसत आहे. सीसीटीव्हीमध्ये ही वेळी रात्री 2 वाजून 2 मिनिटांची आहे. दिल्लीतील कांजवाला घटनेत 20 वर्षीय अंजली सिंहच्या स्कूटीला धडक देऊन तिला सात ते आठ किलीमीटरपर्यंत फरफटत नेले होते. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री हा अपघात घडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी नग्न अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला होता. 


अंजली हिची मैत्रिण निधीचा दिल्ली पोलिसांनी मंगळवारी जबाब नोंदवला होता. त्यानंतर आज ती घटनास्थळापासून पळून जात असताना दिसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. अपघातावेळी स्कूटीवर अंजलीसोबत निधी देखील होती ही माहिती आता पोलिस तपासातून पुढे आली आहे.   






दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी ही मृत अंजली हिची मैत्रिण आहे. 31 डिसेंबर रोजी अपघातावेळी निधीसोबत स्कूटीवर ती देखील होती. कारने त्यांच्या स्कूटीला धडक दिल्यानंतर या अपघातात अंजली किरकोळ जखमी झाली होती. परंतु, अंजली कारखाली फेकली गेली आणि कारने तिला सात ते आठ किलोमीटर फरफटत नेले होते. एवढ्या लांब फरफटत नेल्याने अंजलीचा मृत्यू झाला. परंतु, घाबरल्यामुळे निधीने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, याबाबत तिने कोणालाच सांगितले नाही. दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.   


Delhi Girl Accident :  सीसीटीव्ही फुटेजवरून निधीचा शोध 


स्कूटीला धडक दिल्यानंतर निधीने अपघाताबाबत कोणालाही सांगितले नव्हते. परंतु, घटनास्थळापासूनच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तिचा शोध घेण्यात आला. कारने स्कूटीला समोरून धडक दिली. त्यानंतर निधी रस्त्याच्या एका बाजूला पडली तर अंजली गाडीखाली अडकली, असा जबाब निधीने पोलिसांना दिला. 


Delhi Girl Accident : अपघातानंतर निधीने घटनास्थळावरून पळ काढला


निधीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर अंजली कारखाली आल्याची संशयितांना माहिती होती. तरी देखील त्यांनी तिला कारसोबत तसेच फरफटत नेलं. निधीने दावा केलाय की, अपघातावेळी अंजली नशेत होती आणि तरी देखील ती गाडी चालवण्यासाठी हट्ट करत होती. यावरून हॉटेलबाहेर दोघींमध्ये वाद देखील झाला होता. अपघातानंतर खूप घाबरल्यामुळे मी घटनास्थळावरून पळ काढला, असे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान, या अपघातप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून सर्व जण सध्या पोलिस कोठडीत आहेत.


महत्वाच्या बातम्या
 


दिल्ली हादरली! स्कूटीला धडक देऊन मुलीला सात -आठ किलोमीटर फरफटत नेलं