मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असते. अलिकडे ती कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करताना दिसते. नुकत्याच रीलीज झालेल्या 'तांडव' या बेव सीरिजवर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली होती. आता तिचे ट्विटर अकाउंटवर बंदी आणा अशी मागणी करणाऱ्यांना कंगनाने त्यांचं जीवन जगणं कठीण करेन अशी धमकीच दिली आहे.


कंगना रनौतने एक ट्वीट करुन थेट ट्विटरचा संस्थापक जॅक डोर्सी आणि लिबरल लोकांवर टीका केली आहे. ती म्हणाली की, "उदारमतवादी लोक आता त्यांच्या जॅक काकाकडे जाऊन माझे अकाउंट बंद करावे या साठी रडत आहेत. माझे अकाउंट आता कोणत्याही क्षणी देशासाठी शहीद होऊ शकते. परंतु माझे रिलोडेड देशभक्ती व्हर्जन हे माझ्या चित्रपटांच्या माध्यमातून समोर येईल. तुमचं जीवन जगणं कठीण करणार आहे."





Tandav | 'अल्लाहची थट्टा कराल?'; 'तांडव'च्या दिग्दर्शकांना कंगना रनौतचा सवाल


कंगनाने आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये म्हटंलय की, "काही देशद्रोही लोक सोशल मीडियात #SuspendKanganaRanaut हा हॅशटॅग ट्रेन्डिंग करत आहेत.....त्यांनी तसं करावं. या लोकांनी ज्यावेळी रंगोलीच्या ट्विटरवर बंदी आणली त्यावेळी मी त्यांचे जीवन जगणं कठीण केलं. आता जर माझे अकाउंट त्यांनी बंद केलं तर मी या व्हर्च्युअल जगात नसेन पण खऱ्याखुऱ्या जगात त्यांना खरी कंगना काय आहे ते दाखवते. या सर्व बापांची आई... #babbarsherni."





या आधी कंगनाने 'तांडव' च्या दिग्दर्शकांना अल्लाहची थट्टा कराल क असा सवाल विचारला होता. या वेबसीरिजमध्ये जाणूनबुजून विवादास्पद दृश्यांचा समावेश करण्यात आला असल्याची आरोपही तिने केला आहे.


Dhaakad : कंगना रनौतच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, हातात तलवारीसह रक्तात माखलेला फोटो व्हायरल


कंगना रनौतने भाजप नेते कपिल मिश्रा यांचं एक ट्वीट रिट्वीट केलं. त्यात ती म्हणाली की, "माफी मागण्यासाठी जीवंत कुठे राहणार? हे तर थेट गळाच चिरतात, जिहादी देश फतवाच काढतात, उदारमतवादी मीडिया त्याचं वर्च्युअल लॉन्चिंग करतं, तुम्हाला केवळ ठार मारलंच जात नाही, तर तुमच्या मृत्यूला न्यायोचित ठरवलं जातं, सांगा अली अब्बास जफर, आहे हिंमत, अल्लाहची थट्टा करण्याची?"





'तांडव' या बेव सीरिजमध्ये भगवान शंकर आणि भगवान राम यांचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करुन उत्तर प्रदेशमध्ये या वेब सीरिजचे दिग्दर्शकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता या वेब सीरिजचे दिग्दर्शक अलू अब्बस जफर यांनी या प्रकरणी कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं सांगत माफी मागितली आहे.


ट्रम्प प्रकरणावरुन कंगनाचा ट्विटरवर निशाणा, म्हणाली- इस्लामी देशांनी तुम्हाला खरेदी केलंय