मुंबई: अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने सातत्याने चर्चेत असते. गेल्या काही दिवसात देशातील प्रत्येक महत्वपूर्ण घटनेवर तिने आपले मत व्यक्त केलंय. ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कंगनाने आता ट्विटरवर निशाणा साधलाय.


जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतच्या स्टेट कॅपिटलमध्ये प्रवेश करुन ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घातला. त्यामुळे अमेरिकेची लक्तरे वेशीवर मांडली गेली. दरम्यान ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


Sedition Case | कंगनाच्या अडचणीत वाढ, देशद्रोहाच्या गुन्ह्याप्रकरणी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जबाब


कंगनाने एक ट्वीट करत ट्विटरच्या या निर्णयावर टीका केली आहे. तिने सांगितले आहे की ट्विटरचा हा निर्णय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. कंगनाने ट्विटरवर टीक करताना म्हटले आहे की, "इस्लामी देशांनी आणि चीनी प्रोपगंडाने आपल्याला खरेदी केलं आहे. आपल्याला केवळ स्वत: चा फायदा दिसतोय. त्यानुसार तुमची भूमिका ठरते."


कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, "तुम्ही खूपच बेशरम पध्दतीने दुसऱ्यांच्या विचाराबद्दल असहिष्णूता दाखवता. तुम्ही स्वत:च्या लोभाचे गुलाम बनत आहात. कंगनाच्या या ट्वीटवरुन आता सोशल मीडियात दोन गट पडले असून एका गटाने कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे तर दुसऱ्या गटाने ट्विटरचा निर्णय योग्य ठरवला आहे."





कंगनाची कमल हसन आणि शशी थरुर यांच्यावर टीका, घरकामाला प्राइस टॅग लावू नका


अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरुन आता ट्विटरचे प्रमुख जॅक डोर्सी यांचे एक जुने ट्वीट व्हायरल होताना दिसतंय. त्यामध्ये जॅक डोर्सी म्हणाले होते की, ट्विटर नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे असेल आणि त्याचा नेहमी सन्मान केला जाईल. आम्ही व्यक्त होणाऱ्यांसोबत उभे राहू


डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट बंद केल्यानंतर ट्विटरवर निशाणा साधणाऱ्या कंगनाचे ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी बंद करावे अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


कंगनाच्या ट्विटर अकाऊंटवर कायमची बंदी आणण्यासाठी हायकोर्टात याचिका