बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये कंगना रनौत एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. आज चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून निर्मात्यांनीही रिलीजची तारीख जाहीर केली आहे.


हा चित्रपट 1 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान देशभरातील थिएटर बंद होती. आता हळूहळू चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होत आहेत.


आज प्रसिद्ध झालेल्या पोस्टरमध्ये कंगना रनौतच्या हातात तलवार असून सर्वत्र रक्त दिसत आहे. अशा अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्ममुळे भारतीय सिनेमा वेगळ्या पातळीवर जाईल, असा निर्मात्यांचा दावा आहे.



यात कंगना रनौत एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. कंगनाने सांगितले, की "धाकड हा अॅक्शनपट असून मोठा चित्रपट आहे. आतापर्यंत अशी शैली हिंदी चित्रपटांमध्ये वापरलेली नाही. मी चित्रपटात एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे आहे."


काही दिवसांपूर्वी एक टीझरही रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये रक्ताने माखलेली कंगना हातात एक मोठी मशीनगन घेऊन चालताना दिसत आहे. नंतर ती उभी राहिल्यानंतर गोळ्यांचा पाऊस पडताना दिसत आहे.




या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात जाहिरात चित्रपट निर्माता रजनीश 'राजी' घई करणार आहेत. सोहेल मक्लाई प्रॉडक्शन आणि एजाइलम फिल्म्स संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. चिंतन गांधी आणि रिनेश रवींद्र यांच्यासमवेत अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाची कथा राजी यांनी लिहिली आहे. रितेश शहा यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.