नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या वतीने कोरोना लसीकरणाच्या संबंधित एक नवीन ट्रॅकरचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. या ट्रॅकरला MyGov या वेबसाइटवर अपडेट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना लसीकरणाच्या संबंधित टेस्टिंग स्टेट्स आणि अॅक्टिव्ह केसेस आणि इतर प्रकारच्या माहितीचे रियल टाइम अपडेट्स मिळू शकतील.


MyGov या वेबसाइटवरुन रोजच्या रोज कोरोनाच्या लसीकरणासंबंधी टेस्टिंग स्टेट्स आणि अॅक्टिव्ह केसेस् चे रियल टाईम स्टेट्स देण्यात येत आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून कोरोनाविरोधात कशा प्रकारची पावले उचलण्यात येत आहेत याची माहिती तसेच राज्यवार आकडेवारीही देण्यात येत आहे. त्याचसोबत काही महत्वाच्या बातम्यासंबंधीची माहितीही देण्यात येते.





Corona Vaccine Drive | आसाममध्ये कोविशील्ड लसीचे 1000 डोस गोठलेल्या अवस्थेत सापडले, चौकशीचे आदेश


केंद्र सरकारच्या वतीने लसीकरणासाठी नोंदणीकरण करणे तसेच लोकांपर्यंत लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती पोहचवण्यासाठी 'को-विन' नावाचे एक अॅप तयार करण्यात आले आहे. कोरोनाच्या लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी या अॅपवर नोंदणी करणे आणि महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.


को-विन अॅपमध्ये माहिती भरताना अनेकांना अडचणी येताना दिसत आहेत. त्यामुळे हे अॅप पूर्ण कार्यक्षमतेनं चालू नसल्याचं दिसून येतंय. सोमवारी काही राज्यांमध्ये या अॅपबद्दल तक्रारी आल्या. थोड्या वेळाने हे अॅप पुन्हा सुरळीत झाले.


Corona Vaccine | भारतीय जनता आणि सरकारच्या वतीनं मित्र राष्ट्रांना कोरोना लसीचं 'गिफ्ट'


पंजाब आणि हरयाणा या राज्यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमासंबंधी को-विन अॅपच्या वापराच्या नियमांना सुलभ केलं आहे. या दोन राज्यातील आरोग्य विभागाने लसीकरणासाठी आवश्यक नोंदणीकरणाशिवाय हे अभियान पुढे नेण्यास मंजूरी दिली आहे. लसीकरण करण्यात आलेल्या लोकांचा मॅन्युएल स्वरुपातील डेटा नंतर अपलोड करण्यात येणार असल्याचं या दोन राज्यांनी स्पष्ट केलंय.


... तर कोवॅक्सिन लस घेऊ नका; भारत बायोटेककडून नव्या गाईडलाईन्स जारी