मुंबई : दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेली तांडव (Tandav) वेबसीरिज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गेल्या आठवड्यात अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर प्रसिद्ध झालेल्या वेबमालिकेत हिंदू देवतांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवल्याच्या आरोप दिग्दर्शकांवर करण्यात आला आहे. अभिनेता सैफ अली खान अभिनीत या वेब सीरिजवर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनेही टीकेची झोड उठवली आहे.


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सोमवारी अली अब्बास जफर यांच्या सध्या विवादात अडकलेली नवी वेब सीरिज तांडववर टीका केली. ज्यामध्ये सैफ अली खानने अभिनय केला आहे. कंगनाने तांडववर टीका करताना ही वेबसीरिज 'हिंदू फोबिक, एट्रोसियस आणि ऑब्जेक्शनेबल' म्हटलं आहे.


कंगना रनौतने एक ट्वीट रिट्वीट करत म्हटलं आहे की, "समस्या केवळ हिंदू फोबिक कॉन्टेंटची नाही, तर ही वेबसीरिज रचनात्मकरित्याच खराब आहे. प्रत्येक स्तरावर आक्षेपार्ह्य आहे. त्यामुळे जाणूनबुजून विवादास्पद दृश्यांचा समावेश या वेबसीरिजमध्ये करण्यात आला आहे. त्यांना केवळ अपराधित कटकारस्थानांसाठीच नाहीतर, प्रेक्षकांचा छळ करण्यासाठीही तुरुंगात टाकलं पाहिजे."


कंगनाचं ट्वीट :





तांडव वेबसीरिजवरुन सध्या वाद उसळला आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी आपल्या संपूर्ण कास्ट आणि क्रूच्या वतीनं माफी मागितली आहे. ते म्हणाले की, त्यांचा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा, किंवा कोणताही धर्म आणि राजकीय पक्षांचा अपमान करण्याचाही नव्हता.


कंगनाने अली अब्बास यांनाही खडे बोल सुनावले आहेत. कपिल मिश्रा यांचं ट्वीट रिट्वीट करत कंगना म्हणाली की, "माफी मागण्यासाठी वाचणार कुठे? हे तर थेट गळाच चिरतात, जिहादी देश फतवाच काढतात, लिब्ररल मीडिया वर्च्युअल लॉन्चिंग करतं, तुम्हाला केवळ मारलंच जात नाही, तर तुमच्या मृत्यूला जस्टिफायही केलं जातं, सांगा अली अब्बास जाफर, आहे हिंमत, अल्लाहची चेष्टा करण्याची?"


कंगनाचं ट्वीट :  





काय आहे प्रकरण?


'तांडव' वेब सीरिजच्या पहिल्या एपिसोडमध्ये एका विद्यापीठाच्या नाटकामध्ये भगवान शंकराच्या भूमिकेत असलेल्या जीशान अयूबला नारदाच्या भूमिकेतील व्यक्ती म्हणते की, "भगवान, काहीतरी करा. सोशल मीडियावर भगवान रामाच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत आहे. मला वाटतंय की, आपण काहीतरी वेगळी रणनीती तयार करायला हवी." त्यावर जीशान अयूब म्हणतो, "मग काय करु, बदलू का?" त्यावर नारद पुन्हा म्हणतो, "भगवान तुम्ही खूपच भोळे आहात."


या दृष्यांना अनेक प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आणखी एका दृष्यालाही प्रेक्षकांनी विरोध दर्शवला असून त्या दृष्याच्या माध्यमातून दलित विरोधी विचार दाखवल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. या प्रकरणावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर कमेन्ट करण्यात येत असून या सीरिजच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर #BanTandavNow हा हॅशटॅगही ट्रेन्ड होतोय.


काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वेब सीरिज विरोधात मत व्यक्त करताना त्यातून डाव्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचाही आरोप केला आहे. तसेच अनेकांनी हा हिंदू विरोधी प्रचार असल्याचं मतही व्यक्त केलं आहे.


दरम्यान, पॉलिटिकल ड्रामावर आधारित 'तांडव' या वेब सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, गौहर खान, जीशान अयूब , सुनिल ग्रोव्हर यांनी भूमिका केल्या आहेत. नऊ एपिसोड असणाऱ्या या वेब सीरिजमधून दिल्लीच्या आणि विद्यापीठाच्या राजकारणावर भाष्य करण्यात आलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :