नवी दिल्ली: दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनादिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावर भाष्य करणं कंगना रनौतला महागात पडलंय. शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचे आपले करार रद्द केले आहेत. याविषयी कंगनाने ट्वीट करुन माहिती दिली आहे.


कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करु शकत नाही. पण आता मी या राष्ट्रद्रोही ब्रॅण्ड्सना आणि या हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला सांगू इच्छिते की, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे जे समर्थन करताहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत."





दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर वक्तव्य करताना कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी आणि खलिस्तानी संबोधलं होतं. त्यामुळे नेटिझन्सकडून तिच्यावर टीकेचा भडिमार करण्यात आला होता. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर कंगनाने या आधीही टीका केली होती.


Farmer Protest | दिल्लीतील हिंसाचारावर भाष्य करताना कंगना म्हणाली…


या ट्वीटसोबत कंगनाने दिल्लीतल्या हिंसाचारावर अनेक ट्वीट केले आहेत. या माध्यमातून तिने दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर सडकून टीका केली आहे.


दिल्लीतील हिंसाचारावर टीका करताना एका व्हिडीओच्या माध्यमातून कंगना म्हणाली होती की, "स्वतःला शेतकरी म्हणून घेणाऱ्या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाकलं पाहिजे. तसेच सरकारने त्यांची संपत्ती जप्त करावी. आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला, तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर यशस्वी मात करुन देश उभारत आहे. याशिवाय कोरोनाच्या संकट काळात आपण संपूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देशांपैकी आपण एक आहोत. हिंसाचाराच्या या प्रकारामुळे जगात आपली खिल्ली उडवली जात आहे. आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही."


Delhi tractor rally violence: दिल्ली हिंसाचाराचा तपास क्राईम ब्रान्चचं विशेष पथक करणार, 22 गुन्हे दाखल