मुंबई : दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि कारवाईबद्दल राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला आहे. दरम्यान या हिंसाचारावर भाष्य करताना अभिनेत्री कंगना रनौतने शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना चर्चेत आली आहे.


कंगना आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाली, स्वतःला जे शेतकरी म्हणून घेत आहेत अशा या दहशतवाद्यांना लोक प्रोत्साहन देत आहेत. जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाका. तसेच त्यांची संपत्ती जप्त करावी. आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय कोरोनाच्या संकट काळात आपण संपूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. त्याच देशांपैकी आपण एक आहेत. आजच्या प्रकारामुळे जगात आज आपली खिल्ली उडवली जात असेल आपल्याला काहीही इज्जत राहिलेली नाही.





आपण केव्हाही अडाण्यासारखे वागतो. दुसऱ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तरी आपल्याकडील काही लोक नग्न होऊन बसतात. यामुळे या देशाचं काहीही होणार नाही, हे असं किती दिवस सुरू राहणार आहे. आपण सर्वजण केवळ तमाशा पाहत आहोत. त्यामुळे बाहेरील जगासमोर आपली काहीही इज्जत राहिलेली नाही, असेही कंगना म्हणाली.


संबंधित बातम्या :