Kamal Raghuvanshi Viral Video : आणखी एका भाजप नेत्याचा भर कार्यक्रमात डान्सरला मांडीवर बसवून किस घेण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ समोर
मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये भाजप नेते मनोहर धाकड यांचा एक अत्यंत आणि घृणास्पद अश्लील व्हिडिओ समोर आला आहे. घटना एक्सप्रेसवेवर बसवलेल्या हाय सिक्युरिटी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Kamal Raghuvanshi Viral Video : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये भाजप नेते मनोहर धाकड यांचा एक अत्यंत आणि घृणास्पद अश्लील व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका महिलेसोबत अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष राजेश दीक्षित यांनी सांगितले आहे की, व्हिडिओची चौकशी करून कारवाई केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, मंदसौरच्या बानी गावातील रहिवासी मनोहर धाकड यांच्या पत्नी वॉर्ड क्रमांक-8 मधील जिल्हा पंचायत सदस्य आहेत. 13 मे च्या रात्रीच्या या व्हिडिओमध्ये, मनोहर धाकड दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर पार्क केलेल्या पांढऱ्या बलेनो कार (MP14CC4782) मध्ये एका महिलेसोबत हायवेवर आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.
बुधवारपासून त्यांचा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही संपूर्ण घटना 8 लेन एक्सप्रेसवेवर बसवलेल्या हाय सिक्युरिटी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ इतका आक्षेपार्ह आणि अश्लील आहे की आम्ही तो तुम्हाला दाखवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. या व्हिडिओने वाद रंगला असतानाच काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशमधील सिवनी मालवा येथील भाजप नेते कमल रघुवंशी यांचाही एक व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये एका लग्न समारंभात एका महिला नर्तकासोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहेत. कार्यक्रमात रघुवंशी समाजासह मोठ्या संख्येने स्थानिक लोक उपस्थित होते. कमल रघुवंशी यांच्या कृत्यामुळे संतप्त होऊन अनेक लोक कार्यक्रम सोडून निघून गेले.
चाल, चरित्र और चेहरा.. सिवनी मालवा के बीजेपी नेता कमल रघुवंशी का एक वीडियो बुधवार को सामने आया है। वीडियो में वे एक दिन पहले यानी मंगलवार को हुए शादी समारोह में महिला डांसर से आपत्तिजनक हरकतें करते दिख रहे हैं। pic.twitter.com/5F1IknzoWC
— Mukta Pathak (@mukta_pathak) May 1, 2025
कमल रघुवंशी म्हणाले, कोणीही काहीही बोलू शकते
आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेते कमल रघुवंशी म्हणाले की ती आमच्या घरची मुलगी होती. ज्याला ते आवडत नाही तो काहीही बोलू शकतो. माझे मन शुद्ध आहे. कुठेही अशी शंका नाही.
कमल रघुवंशी हे देखील काँग्रेस पक्षातही होते
कमल रघुवंशी हे देखील काँग्रेसमध्येही होते. त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसपासून सुरू झाली. त्यांनी प्रदेश सरचिटणीससह काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून आमदारकीचे तिकीट मागितले, जेव्हा त्यांना ते मिळाले नाही तेव्हा ते निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील झाले. सध्या त्यांच्याकडे भाजपमध्ये कोणतेही पद नाही.
काँग्रेस पक्षाकडून विधानसभेचे तिकीट मागितले होते
कमल रघुवंशी यांनी काँग्रेस पक्षाकडून सिवनी मालवा विधानसभा-136 मधून तिकीट मागितले होते. माजी विधानसभा अध्यक्ष हजारीलाल रघुवंशी यांच्या काळात ते काँग्रेसशी संबंधित होते. ते किसान काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस होते.
इतर महत्वाच्या बातम्या























