कमल हसन यांच्या पक्षाचं नाव 'मक्कल नीति मय्यम' हे असून, त्याचा अर्थ 'लोक न्याय पार्टी' असा होतो.
दरम्यान, सकाळी कमल हसन माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी गेले. तिथं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन, कलाम यांच्या पायवाटेवर चालत आपण राजकारण करणार असल्याचंही स्पष्ट केलं.
तसेच, जनतेची सेवा करण्यासाठीच आपण राजकारणात आल्याचं सांगायला ते विसरले नाहीत.