एक्स्प्लोर

Kalicharan : 'भारतात केवळ सनातन धर्म; इस्लाम, ख्रिश्चन धर्मच नाहीत'; कालिचरण महाराजाचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

Kalicharan Controversial statement : महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजानं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदू राष्ट्रासाठी एक व्हा असं म्हणत धर्माच्या आधारे मत द्या, असं त्यानं म्हटलंय. 

Kalicharan On Hindu Religion: महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण महाराजाने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अलिगडमधील संत समागममध्ये बोलताना कालिचरणनं म्हटलं आहे की, हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एक व्हायला हवं. धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत, असं वक्तव्य कालिचरणनं केलं आहे. 

कालिचरणनं यावेळी म्हटलं आहे की, देशाला इस्लामकडे घेऊन जात आहेत. देशात पाच लाख मंदिरं तोडली आहेत आणि 800 वर्षात 80 हजार महिलांसोबत बलात्कार झाला आहे. जर हिंदू राष्ट्र बनलं नाही तर असं होतच राहिल. राजकीय इच्छाशक्तीतून हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते असं त्यानं म्हटलं आहे.  इराक, इराण,  अफगानिस्तान आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देश आपल्या हातातून गेले आणि मुस्लिम राष्ट्र झाले, असं कालिचरणनं म्हटलं आहे. 

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं खाल्ली होती जेलची हवा

मागील डिसेंबर महिन्यात महात्मा गांधींबद्दल कालिचरण महाराजाने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळं त्याला जेलची हवा खावी लागली होती. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यानं म्हटलं होतं की,  मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. यानंतर अनेक ठिकाणी कालिचरण विरोधात गुन्हे दाखल झाले होते. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. 

कोण आहे कालीचरण महाराज  

काही दिवसांपूर्वी कालिचरण महाराजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. शिवतांडव स्त्रोतामुळे कालीचरण महाराज अधिक प्रसिद्ध झाला होता. 'कालीचरण महाराज' अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर मध्ये 'भावसार पंचबंगला' भागात राहतो. अकोल्यातील तरुणाईमध्ये या महाराजांची मोठी क्रेझ आहे. मात्र, कालीचरण महाराज आपल्या भूतकाळाविषयी फारसं काही कुणाला सांगत नाहीत. त्याचे मूळ नाव 'अभिजीत धनंजय सराग' असं आहे. शिक्षणाचे आणि अभिजितचे सख्य फारसं जमले नाही. त्याला शाळेतही जाण्याचा कंटाळा यायचा. लहानपणापासून त्याचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता. त्यातही तो कालीमातेची आराधना करायचा. पुढे अभिजीतचा 'कालीपुत्र कालीचरण' झाला. लोकांनी त्यांना 'महाराज' असे संबोधने सुरू केले. या कालिचरण महाराजाने 2017 मध्ये अकोला महापालिकेची निवडणूक लढवली होती. मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Atul Kulkarni Supports Sonam Wangchuk: अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'
अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, 'तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?'

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Embed widget