UP Crime News : नोएडामधील (Uttar Pradesh) माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरातील तळघरात साडेसहाशे लॉकर्समध्ये कोट्यवधीची काळी माया आढळून आली आहे. माजी सनदी अधिकारी आर. एन. सिंह यांच्या घरावर गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. यात कोट्यवधींची रक्कम सापडली आहे. सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्यानं दिले जातात. 


आयकर विभागानं तळघरात तपासणी केली असता, या लॉकरमध्ये कोट्यवधींची रक्कम आणि दागिने सापडले आहेत. ही रोकड आणि दागिने कुणाचे आहेत? याबाबतची माहिती मिळालेली नाही. आर. एन. सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. त्यामुळे या लॉकरशी आपला संबंध नसल्याचा दावा आर.एन.सिंह यांनी केला आहे. छापेमारीत सापडलेली सर्व संपत्ती जप्त करणार असल्याची घोषणा कालच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे आर. एन. सिंह यांच्या घरात सापडलेली ही काळी माया जप्त करण्यात येणार आहे. 


लॉकर्समधील हे पैसे कोणाचे आहेत? याबाबतची माहिती मिळालेली नाही. अजूनही आयकर विभागाची छापेमारीची कारवाई सुरुच आहे. तळघरात एकूण 650 लॉकर असून त्यात कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे. आर.एन. सिंह उत्तर प्रदेशात डीजी अभियोजन होते. ही फर्म आपला मुलगा चालवत असून आपला त्याच्याशी संबंध नसल्याचे सिंह यांनी सांगितलं आहे. तसेच या लॉकर्सपैकी आपले फक्त 2 लॉकर्स असून त्यात आयकर विभागाला काहीच सापडलं नसल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. 


दरम्यान, नोएडातील माजी सनदी अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरावर गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. त्यात कोट्यवधींची रक्कम सापडली आहे. सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. आयकर विभागाने तळघरात तपासणी केली असता या लॉकरमध्ये कोट्यवधींची रक्कम सापडली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha