एक्स्प्लोर

पत्रकार परिषद घेणारे न्यायमूर्ती चेलमेश्वर निवृत्त

“पत्रकार परिषद घेतल्याचा मला कोणताच पश्चाताप होत नाही, कारण मी नेहमीच व्यवस्था सुधारण्यासाठी काम केलं आहे,” असं निवृत्त होताना न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी म्हटलं आहे. कार्यकाळ संपताच न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी दिल्लीतील आपलं सरकारी निवासस्थान सोडलं आहे.

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टातील दुसरे सर्वांत वरिष्ठ  न्यायमूर्ती जस्टी चेलमेश्वर हे आज निवृत्त झाले. काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती जस्टी चेलमेश्वर यांच्या नेतृत्वात सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी घेतलेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. “पत्रकार परिषद घेतल्याचा मला कोणताच पश्चाताप होत नाही, कारण मी नेहमीच व्यवस्था सुधारण्यासाठी काम केलं आहे,” असं निवृत्त होताना न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी म्हटलं आहे. कार्यकाळ संपताच न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी दिल्लीतील आपलं सरकारी निवासस्थान सोडलं आहे. आता आंध्र प्रदेशातील आपल्या मूळ गावी राहण्याची त्यांची इच्छा आहे. तसंच यापुढे कोणतंही सरकारी पद घेणार नसल्याचंही न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी स्पष्ट केलं. निवृत्त होताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण विधाने केली आहेत. "पत्रकार परिषदेचा पश्चाताप नाही" “इतर न्यायमूर्तींसोबत मीडियासमोर आल्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही, कारण देशातील सर्वांत मोठ्या न्यायालयात पण काहीतरी अडचण आहे, हे मला लोकांसमोर आणायचे होते,” असं त्यांनी म्हटलं आहे. "न्यायालयावर संकट नाही" न्यायालयावर संकट कोणतंही नाही, असा दावा करत ते म्हणाले, “काळ येतो आणि काळ बदलत असतो. आणीबाणीत तयार झालेल्या परिस्थितीबाबत मी माझ्या प्राध्यापकांकडे चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी ते प्राध्यापक म्हणाले होते,जर्मनीतील हिटलरचा काळ यापेक्षा भयंकर होता. त्यामुळे केवळ काही गोष्टींमुळे न्यायपालिकेवर संकट आहे ,असं मला वाटत नाही.” "न्यायाधीश  के एम जोसेफ हे न्यायमूर्ती बनन्यास योग्य" उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असलेले के एम जोसेफ हे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बनण्यास योग्य असल्याचं न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी म्हटलं आहे. “सरकाने जोसेफ यांचे नाव डावलताना दिलेली कारणे योग्य नाहीत,” असंही ते म्हणाले. " न्यायमूर्ती गोगोई सरन्यायाधीश बनण्याची आशा" वरिष्ठतेच्या आधारावर दीपक मिश्रा यांच्यानंतर रंजन गोगोई हे सरन्यायाधीश बनू शकतात. मात्र याबाबतची शिफारस करण्याचा पूर्ण अधिकार हा  सरन्यायाधीशांचाच असतो. या निवडीबाबत चेलमेश्वर यांना विचारलं असता ते म्हणाले, “कोणत्या नावाची शिफारस करायची हा पूर्णपणे सरन्यायाधीशांचा अधिकार आहे. या पदावर वरिष्ठ न्यायमूर्तींची निवड होणार नसेल तर त्याचे कारणही सरन्यायाधीशांना द्यावे लागेल. पण जेष्ठता डावलून ही निवड होईल, असं मला वाटत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
दिल्लीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांना तत्काळ धडा शिकवू, सरकारची मुदत संपत आलीय, राहुल गांधीचा हल्लाबोल
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget