Presidential Polls : जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. भाजपनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे. त्याशिवाय यूपीएच्या मित्रापक्षांसोबत आणि अपक्षांसोबतही भाजप चर्चा करणार आहे. या चर्चेची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे.  






केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करायचे असल्यास लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे सदस्य त्यात सहभागी होतील आणि 21 जुलै रोजी मतमोजणी होईल. त्यानंतर भारताच्या नवीन राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. छोट्या मोठ्या पक्षांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी चुरस सुरु झाली आहे. रविवारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर राष्ट्रपती पदाच्या निवडणूकबाबत मोठी जबाबदारी दिली आहे. एनडीएचे मित्रपक्ष, अपक्ष आणि युपीएच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. 


ममता बॅनर्जी यांनी 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांना लिहिलं पत्र
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांनी देशातील 22 विरोधी पक्ष नेत्यांना  (22 Opposition Leaders) एकत्र येण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पत्रात ममता यांनी विरोधी पक्ष नेत्यांना 15 जून रोजी बैठकीसाठी दिल्लीत बोलावले आहे. भारतात लोकशाही पूर्णपणे संपत आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण विरोधी पक्ष नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. कारण यातूनच पुन्हा एकदा लोकशाही वाचवता येईल.


संबंधित बातम्या: 


Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; 18 जुलै रोजी होणार मतदान
Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे गणित काय असते? जाणून घ्या सोप्या शब्दात