Sonia Gandhi : काँग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची प्रकृती खालावली आहे.  त्यामुळे उपचारासाठी त्यांना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना विषाणू (COVID-19) संबधित आजार बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. 


काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करत सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्ली येथील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. कोरोना संबधित त्रास बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही दिवस ‘अंडर ऑब्झर्वेशन’ ठेवण्यात येणार आहे.  


सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आता अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची बातमी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिल्यामुळे कार्यकर्ते काहीसे चिंतित झाले आहेत. 


नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचं समन्स -
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीनं सांगितलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. काँग्रेसनं हे सूडाचं राजकारण असल्याचा आरोप केला आहे.  


काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरु केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे.