हैदराबाद : नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपात अनेक वर्षे तुरुंगवास भोगलेले आणि नंतर निर्दोष सुटका झालेले दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी प्राध्यापक जी एन साईबाबा (G N Saibaba) यांचे हैदराबाद येथे निधन झाले आहे. त्यांना महाराष्ट्रातील गडचिरोली पोलिसांनी युएपीए कायद्याअंतर्गत 2013 मध्ये अटक केली होती


कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन


जी. एन. साईबाबा यांचा नक्षलवाद्यांशी संपर्क आहे. त्यांचे नक्षल चळवळीशी संबंध आहेत, असा दावा पोलिसांनी केला होता. या आरोपानंतर साईबाबा यांना गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने 2017 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पुढे साईबाबा यांनी या निर्णयाला आव्हान दिले होते. जन्मठेपेच्या शिक्षेनंतर ते अनेक दिवस तुरुंगात होते. मात्र मार्च 2024 साली उच्च न्यायालयाने त्यांची नक्षलवादाच्या आरोपातून निर्दोष सुटकाही केली होती. जी एन साईबाबा यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू होते. उपचार चालू असतानाच कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. 


सात वर्षे तुरुंगात घालवले 


साईबाबा यांच्याशी नक्षलवाद्यांशी संबंध आहेत, असा आरोप करण्यात आला होता. ते दिल्लीतील प्रसिद्ध अशा जेएनयू विद्यापीठीत प्राध्यापक होते. ते 2017 ते मार्च 2024 या काळात नागपूरच्या तुरुंगात होते. त्याआदी 2014 ते 2016 या काळातही त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं.


मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष म्हणून सुटका 


नक्षलवादाच्या आरोपांखाली  साईबाबा यांच्यासह एक पत्रकार तसेच जवाहर नेहरू विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांना गडचिरोलीच्या सत्र न्यायालयाने 2017 साली दोषी ठरवलं होतं. त्यानंतर याच निर्णयाला आव्हान दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबा यांची निर्दोष म्हणून मुक्तता केली होती.


हेही वाचा :


Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दिकी यांच्यावर रात्री 8.30 वाजता अंत्यसंस्कार 


तिघं आले, गोळ्या झाडल्या, पण सिद्दिकींच्या हत्येमागचा खरा नराधम वेगळाच? चौथा मास्टरमाईंड नेमका कोण?


रिक्षाने आले, वाट पाहिली, अन् थेट फायरिंग; बाबा सिद्दिकींवरील गोळीबाराचा कट नेमका कसा शिजला?