एक्स्प्लोर

Jignesh Mevani : हा तर 56 इंची भ्याडपणा; जिग्नेश मेवाणींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Jignesh Mevani : महिलेचा आधार घेऊन खोटा गुन्हा दाखल करणे हा 56 इंची भ्याडपणा असल्याची घणाघाती टीका गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली.

Jignesh Mevani : पंतप्रधान कार्यालयातील काही भक्तांनी मााझ्याविरोधात एफआयआर केली. माझ्याविरोधात एका महिलेचा वापर करून खोटा गुन्हा दाखल केला. ही कृती म्हणजे 56 इंची भ्याडता असल्याचा जोरदार हल्लाबोल गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केली. आसाममध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर मेवाणी यांनी आज वडनगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. 

जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले की, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त केले जात आहेत. त्याशिवाय पेपर फुटीचेही प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. भाजपच्या मंत्र्यावर बलात्काराचा आरोप होतो. मात्र, या प्रकरणात कोणताही FIR दाखल होत नाही. मात्र, माझ्या एका ट्वीटवर माझ्याविरोधात एफआयआर दाखल होतो आणि अटक केली जाते. गोडसेचा भक्त असल्याचे म्हटले की यांना मिरची झोंबत असेल तर त्यांनी (भाजप) एकदा लाल किल्ल्यावरून गोडसे मुर्दाबादच्या घोषणा द्याव्यात असे आव्हान मेवाणी यांनी दिले. 

जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले की, माझ्याविरोधात कोणताच खटला होत नसल्याचे कोर्टाने स्पष्टपणे सांगितले. ट्वीट करून मी कोणता गुन्हा केला, असा सवालही जिग्नेशने केला. माझ्या ट्वीटमध्ये शांततेचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर जे झालं जगजाहीर असल्याचे मेवाणी यांनी म्हटले. 

गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ट्वीट केलं होत. याप्रकरणी त्यांना आसाम पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर अटक केली होती. मात्र आसाममधील कोक्राझार येथील न्यायालयाने त्यांना या प्रकरणी मागील आठवड्यात जामीन मंजूर केला होता. कोक्राझार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भावना काकोटी यांनी त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला. या जामीनानंतर महिला अधिकाऱ्याला धक्काबुकी केल्याच्या आरोपात मेवाणींना पुन्हा अटक करण्यात आली. या प्रकरणातही मेवाणींना जामीन देण्यात आला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget