Jharkhand Election Results 2019: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झालं होतं. एकूण 1216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल.




  • झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन दुमका आणि बरहेट या दोन्ही मतदारसंघात आघाडीवर

  • कलानुसार विधानसभेत त्रिशंकु परिस्थितीची शक्यता, कोणालाही बहुमत नाही

  • कल बदलले, भाजपला 30 जागांवर आघाडी, तर काँग्रेस आघाडीकडून बहुमत निसटलं, सध्या 37 जागांवर आघाडी, झारखंड विकास मोर्चा तीन, इतर सात जागांवर पुढे

  • झारखंड निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस-जेएमएम-राजद आघाडीने बहुमताच्या आकड्याजवळ, कलानुसार काँग्रेस+40, भाजप 25 जागांवर आघाडीवर


Jharkhand Election Results 2019: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झालं होतं. एकूण 1216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. रघुवर दास पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार की काँग्रेस-जेएमएम आघाडीची सत्ता स्थापन होणार याकडे लक्ष लागलं आहे.


चतरा मतदारसंघात मतमोजणीच्या 28 फेऱ्या होणार असून सर्वात कमी दोन फेऱ्या चंदनकियारी आणि तोरपा मतदारसंघात होणार आहेत. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. ही निवडणूक सत्ताधारी भाजपने स्वबळावर लढवली आहे. तर काँग्रेस-जेएमएम आणि राजदची आघाडी आहे.


एक्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या विजयाचा अंदाज
बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस-जेएमएम आणि राजदला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर एबीपी आणि सीवोटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 32, महाआघाडी 35, जेव्हीएम 3 आणि आजसू 5 आणि इतर 6 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. बहुमतासाठी 41 जागांची गरज आहे.


निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस आघाडीने मतदारांना आकर्षित करण्याचा पुरपूर प्रयत्न केला आहे.  झारखंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वेगवेगळ्या नऊ सभा संबोधित केल्या होत्या. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच तर पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी एका सभेला संबोधित केलं होतं.


2014 मधील पक्षीय बलाबल
2014 च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने 37 जागा जिंकून ऑल झारखंड स्टूडेंट यूनियन (AJSU) सोबत सत्ता स्थापन केली होती. AJSU ने पाच जागांवर विजय मिळाला होता. तर निवडणुकीनंतर झारखंड विकास मोर्चा (जेव्हीएम) च्या आठपैकी सहा आमदारांनी भाजपला साथ देऊन सत्तेत सहभागी झाले होते. तर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 19, काँग्रेस 6  आणि इतरांना 6 जागांवर विजय मिळवता आला होता.


संबंधित बातम्या

Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता

Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार, एक्झिट पोलचा अंदाज