Jharkhand News: झारखंडमधील धनबाद येथे एक मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. येथील धनबादजवळील अवैध कोळसा खाणकामादरम्यान गुरुवारी जमीन कोसळली. झारखंडमधील धनबादमध्ये अवैध कोळसा खाणकाम सुरू असताना ही मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या खाणीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी झारखंडमध्ये कोळसा खाण कोसळल्याने अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना घडली तेव्हा कोळशाचे बेकायदेशीर उत्खनन सुरू होते, असं म्हटलं जात आहे. 


यावर्षी फेब्रुवारी महिन्यातही झाला होता अपघात 


या वर्षी फेब्रुवारीमध्येही धनबादमध्ये बेकायदेशीर कोळसा खाण कोसळून अनेक कामगारांचा मृत्यू झाला होता. तीन बंद कोळसा खाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन सुरु असताना त्या अचानक कोसळल्या. या घटनेत चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. धनबादच्या गोपीनाथपूर भागातील ईस्टर्न कोलफिल्ड्सच्या ओपन कास्ट माइनमध्ये ही घटना घडली.


नोव्हेंबरमध्ये बोकारो येथील कोळसा खाणीत चार जण अडकले होते


गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात कोळसा खाणीत चार जण अडकले होते. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. 


हे देखील वाचा-