Bulldozer History:

  मागील काही महिन्यांपासून बुलडोझर चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरही बुलडोझरची चर्चा सुरू आहे. बुलडोझर हा तोडकामासाठी ओळखला जात आहे. ज्यावेळेस, बुलडोझरचा शोध लागला त्यावेळी घरं पाडण्यासाठी किंवा तोडक कारवाईसाठी याचा वापर करण्यात आला नव्हता. तर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी याचा वापर करण्यात आला. 


बुलडोझरचा शोध लागला तेव्हा शेती कामासाठी याचा वापर करण्यात येत होता. बुलडोझरचा शोध हा जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या शोधापैकी एक आहे. 


बुलडोझरचा शोध  James Cummings आणि  J. Earl McLeod यांनी 18 डिसेंबर 1923 मध्ये  लावला. ज्यावेळी शोध लागला त्यावेळी या बुलडोझरचा वापर घरं पाडण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी होईल याची अपेक्षाही केली नसणार. सुरुवातीच्या काळात या बुलडोझरचा वापर शेतीसाठी करण्यात येत होता. काळानुसार याचा वापरही अधिक वाढू लागला. मग, त्यानंतर बुलडोझर बहुपयोगी म्हणून सिद्ध होऊ लागले. इमारतीचे बांधकाम, रेती-माती उपसा करणे, खोदकाम आदी कामांसाठी याचा वापर होऊ लागला. 


वर्ष 1925 मध्ये अटॅचमेंट फॉर ट्रॅक्टर्स नावाने याचे पेटंट काढण्यात आले. शक्तिशाली इंजिन हे बुलडोझरचे खास वैशिष्ट्ये आहे. त्यामुळे मोठ्या वास्तू, इमारतीचा भाग सहजपणे तोडता येत होते. वर्ष 1940 मध्ये बुलडोझरचा वापर केवळ ट्रॅक्टरसोबत करण्यात येत होता. त्याच्या मदतीने अधिकाधिक शेत नांगरता येत होते. 


मात्र, त्यानंतर ट्रॅक्टरपासून याला वेगळे करत एक वेगळी मशीन तयार करण्यात आली. त्यानंतर बुलडोझरमध्ये बदल करण्यास सुरुवात झाली. ओबड-धोबड रस्त्यावरून मार्गक्रमणा करण्यासाठी चाकांमध्ये बदल करण्यात आला. बुलडोझरच्या रचनेतही बदल झाला. आज या बुलडोझरचा वापर वेगळ्या कामासाठी सुरू आहे. कोणी विचारही केला नसेल की, बुलडोझरचा संबंध आता राजकीय कृतीदेखील जोडला जाईल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: