एक्स्प्लोर
जेट एअरवेजची सेवा आज रात्री 12 नंतर पुर्णपणे बंद, बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने निर्णय
बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची सेवा बंद होणार आहे.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : बँकांकडून 400 कोटींची मदत न मिळाल्याने जेट एअरवेजचा सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 12 वाजेपासून जेट एअरवेजची विमानसेवा बंद होणार आहे. जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी जेटची मुंबई-नाशिक विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतू आता आपली सेवा पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने बँकांकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. परंतू बँकांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने आज रात्री 12 नंतर जेटची विमानसेवा बंद होणार आहे. आज रात्री 10.30 वाजता जेट एअरवेजचं शेवटचं विमान उडणार आहे. जेट एअरवेजच्या आर्थिक अडचणी वाढल्यानंतर 25 मार्च रोजी संस्थापक नरेश गोयल यांनी आपल्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांपूर्वीच जेटची आंतरराष्ट्रीय विमानसेवा देखील बंद करण्यात आली होती. जेट एअरवेज बंद पडल्यानं 20 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके




















