Jet Airways New Start: एकेकाळी स्वतःची वेगळी ओळख असणारी जेट एअरवेज पुन्हा एकदा गगन भरारीसाठी सज्ज झाली आहे. कंपनी आपल्या री-लॉन्चिंगची जोरदार तयारी करत असून आता जेट एअरवेजला सरकारकडून महत्त्वाची मंजुरीही मिळाली आहे.


गृह मंत्रालयाकडून मिळाली मंजुरी 


पीटीआयच्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाने जेट एअरवेजला सुरक्षा संबंधित मंजुरी दिली आहे. अधिकृत माहितीनुसार, कंपनीची विमानसेवा काही महिन्यांत सुरू होणार आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने कंपनीला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, त्यांना गृह मंत्रालयाकडून महत्वाची सुरक्षा मंजुरी देण्यात आली आहे.


गुरुवारी विमानाची चाचणी करण्यात आली


एप्रिल 2019 पासून बंद असलेली ही विमान सेवा नवीन अवतारात आता समोर येणार आहे. नरेश गोयल यांच्या या कंपनीचे नवे मालक आता Jalan-Kalrock Consortium आहेत. गुरुवारी कंपनीने हैदराबाद विमानतळावर आपल्या एका उड्डाणाची चाचणी देखील केली. कंपनीने फ्लाइट एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएसमोर आपली विमाने आणि इतर घटकांच्या योग्य कार्याचा पुरावा देण्यासाठी ही चाचणी घेतली होती. यानंतर डीजीसीए कंपनीला एअर ऑपरेटर प्रमाणपत्र देईल.


चाचणीबद्दल इंडिगोचे केले अभिनंदन


जेट एअरवेजच्या चाचणी उड्डाणाबद्दल इंडिगोने अभिनंदन केले. कंपनीने ट्विट करून म्हटले होते की, नवीन सुरुवातीसाठी अभिनंदन.







इतर महत्वाच्या बातम्या: