Taj Mahal News: ताजमहालमध्ये (Taj Mahal ) बंद असलेल्या 22 खोल्या उघडण्यात याव्यात अशी मागणी भाजपच्या एका प्रवक्त्याने केली आहे. या भाजपच्या प्रवक्त्याने 22 खोल्या उघडण्यात याव्यात यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल केली आहे. तसेच याची एएसआय कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.


दरम्यान, ताजमहालमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावाही भाजपच्या प्रवक्त्याने या याचिकेत केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, ताजमहालबाबत अयोध्येतील भाजपच्या प्रवक्त्याने ही याचिका दाखल केली आहे. मी ASI ला देखील ताजमहालमधील या 22 खोल्या बंद करण्याचे कारण काय आहे? असे विचारले आहे. तसेच मी सांस्कृतिक मंत्रालयाला देखील विचारले की खोल्या बंद ठेवण्याचे खरे कारण काय आहे?  सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती सांगण्यात आल्याचे भाजपच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.



खोल्या कोणाच्या आदेशावरुन बंद आहेत?


दरम्यान, कोणाच्या आदेशाने खोल्या बंद करण्यात आल्या आहेत? असा सवाल याचिकाकर्त्याने केला आहे. ज्यावर त्यांच्या बाजूने समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यानंतर मी ही याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. ताजमहाल ही छोटी जागा नाही. या खोल्या का बंद आहेत, याचे उत्तर मिळाले पाहिजे. या खोल्यांमुळे ताजमहालबाबत अनेकदा वाद निर्माण होत असल्याचेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.


जगातील सात आश्चर्यापैकी ताजमहाल हे एक आहे. ताजमहालाची भव्यता आणि सुंदरतेमुळे जगभरात ओळख आहे. ताजमहालला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते. ताज महाल मुघल बादशाह शाहजहान याने आपली पत्नी मुमताज महलची आठवण म्हणून बनवले होते. ताजमहाल उत्तम मानवी कृलाकृतीपैकी एक आहे. ताजमहल पांढऱ्या संगमरवरपासून बनवण्यात आला आहे. ताज महाल हे भारतातील उत्तर प्रदेश मधील आग्रा ह्या शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. ताज महाल ला जगातील सात आश्चर्यांपैकी एक होण्याचा मान मिळाला आहे. ताजमहाल म्हणजे सफेद रंगाची उत्कृष्ट आणि कलाकृती असलेली इमारत आहे. ही इमारत मोघल बादशाह शहाजहानने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ (1632ते 1653 दरम्यान) बांधली होती. मुमताज ही शहाजहान ला त्याच्या इतर पत्नींपेक्षा प्रिय होती. आपल्या 14 व्या पुत्राला जन्म देताना तिने देहत्यागला आणि तिच्या आठवणीत ताजमहाल उभे राहिले. या इमारतीच्या बांधकामाला पूर्ण होण्यास एकूण 21  वर्षांचा कालावधी लागला. ताज महाल चे काम करण्यासाठी एकूण 20 हजार कामगार खर्ची पडले होते.