नवी दिल्लीः दिवाळीनिमित्त पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी विमान कंपनी जेट एअरवेजने 'डील वाली दिवाली' ही खास ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे 921 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
इकोनॉमी श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ऑफर असणार आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी 30 ऑक्टोबरपूर्वी जेट एअरवेजचं तिकीट बूक करणं गरजेचं आहे. तिकीट घेतल्यानंतर पुढील पंधरा दिवसात कधीही प्रवास करता येणार आहे. मात्र एकदा तिकीट बूक केल्यानंतर तिकिट रद्द करता येणार नाही.
देशांतर्गत प्रवासासाठी 921 रुपयात प्रवास करता येईल, अशी माहिती जेट एअरवेजच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. दरम्यान या ऑफरनुसार किती जागा आरक्षित ठेवल्या आल्या आहेत, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे अगोदर तिकीट बूक करणाऱ्या प्रवाशांनाच या ऑफरचा लाभ मिळणार आहे.