नवी दिल्ली : सातत्याने चर्चेत असलेलं दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ अर्थात जेएनयू पुन्हा चर्चेत आलं आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला आहे.



जे आर फिलेमॉन असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मणिपूरचा रहिवाशी होता. जेएनयूमध्ये तो पीएचडी करत होता.



गेल्या तीन दिवसांपासून तो कोणालाही दिसला नव्हता. त्याच्या रुममधून दुर्गंधी पसरल्यानंतर, दरवाजा उघडला असता, त्याचा मृतदेह आढळला.



फिलेमॉन हा जेएनयूतील ब्रह्मपुत्र हॉस्टेलच्या 171 नंबरच्या खोलीत राहात होता. ही खोली गेल्या तीन दिवसांपासून बंद होती.