एक्स्प्लोर

उन्नाव प्रकरणाचा निषेध करताना जया बच्चन थट्टा मस्करीत दंग, नेटकऱ्यांचा संताप

समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत उन्नाव बलात्कार पीडितेवरील हल्ल्याचा निषेध केला. यात सपाचे खासदार राम गोपाल यादव आणि जया बच्चन यांचाही याच समावेश होता. परंतु या निषेधाचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या अपघाताचा राजकारण्यांपासून कलाकारपर्यंत अनेकांनी निषेध केला. बऱ्याच जणांनी सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काहींनी रस्त्यावर उतरुन संताप व्यक्त केला. परंतु ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी केलेला निषेध सध्या चर्चेचा विषय बनला आहे. भाजपचा आमदार कुलदीप सिंह सेंगर हा उन्नाब बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. समाजवादी पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत उन्नाव बलात्कार पीडितेवरील हल्ल्याचा निषेध केला. यात सपाचे खासदार राम गोपाल यादव आणि जया बच्चन यांचाही याच समावेश होता. परंतु या निषेधाचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. एका गंभीर मुद्द्याचा निषेध सुरु असताना, जया बच्चन आपल्या सहकारी खासदारांसोबत हसताना, थट्टा-मस्करी करताना दिसत आहेत. या प्रकाराचा नेटकऱ्यांना जया बच्चन यांचा खरपूस समाचार घेतला. निवडक ट्वीटवर एक नजर... एकाने ट्वीट केलं आहे की, उन्नाव प्रकरणाविरोधातील निषेधाचं गांभीर्य त्यांच्या हास्यातून दिसत आहे. गंभीर, दु:खद घटना; आनंदी, हसतमुखाने चर्चा, आजचा ड्रामा, असं एका म्हटलं आहे. गांधीजी वगळता उर्वरित सगळेत हसतच आहेत, असं ट्वीट एकाने केलं आहे. हसणारे आणि आनंदी चेहरे कोणत्याही गुन्ह्याचा निषेध दाखवत नाहीत, हा फक्त त्यांचा राजकीय .... आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. जया बच्चा हसत कशाचा विरोध करत आहे, असा प्रश्न एका ट्विपलने केला आहे. हे किती आनंदी आहेत... अपघातात पीडित तरुणी, वकील गंभीर जखमी उन्नाव बलात्कार पीडित तरुणी, काकी, मावशी आणि वकील महेंद्रसिंह यांच्यासोबत रविवारी (28 जुलै) रायबरेली इथल्या जेलमध्ये कैद असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी जात होती. परंतु रस्त्यात गुरबख्शगंज परिसरात एता भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीच्या मावशीने स्थानिक रुग्णालयात प्राण सोडला. तर काकीला लखनौमधील ट्रॉमा सेंटरमध्ये मृत घोषित करण्यात आलं. या घटनेत पीडित तरुणी आणि वकील गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. दोघेही ट्रॉमा सेंटरमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा यापूर्वीच संशयित मृत्यू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget