एक्स्प्लोर

मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला ब्रेक, जपानने बुलेट ट्रेनचा फंड रोखला!

जपानी कंपनीने मोदी सरकारला शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यास सांगितलं आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेट ट्रेनच्या ड्रीम प्रोजेक्टला आणखी एक झटका बसला आहे. या प्रकल्पाला अर्थसहाय्य करणारी जपानी कंपनी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीने (जीका) पैसा पुरवणं थांबवलं आहे. पालघरच्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानी कंपनीने मोदी सरकारला शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यास सांगितलं आहे. 1 लाख कोटी रुपये किमतीचा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. त्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनींचं अधिग्रहण सुरु आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी त्याला विरोध करत आहेत. या वादानंतर केंद्र सरकारने एका विशेष समितीची स्थापना केली आहे. त्यानंतर आता जपानच्या कंपनीने अर्थसहाय्य रोखलं आहे.  मोदी सरकारने आधी शेतकऱ्यांची समस्या सोडवावी असं या कंपनीने म्हटलं आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी रुपये खर्च नियोजित असून, यासाठी जपान 88 हजार कोटीचं कर्ज देणार आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर बुलेट ट्रेन हे पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे. एकीकडे मोदी सरकारने बुलेट ट्रेन  2022 पर्यंत सुरु करण्याचं ध्येय ठेवलं असताना, जपानी कंपनीने अर्थसहाय्य रोखल्याने आता ते लक्ष्य गाठणं आणखी कठीण होणार आहे. जीका ही जपान सरकारची एजन्सी आहे. ही कंपनी जपान सरकारसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक-आर्थिक धोरणांसाठी काम करते. तर भारताकडून नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचआरसीएल) भारतात बुलेट ट्रेनची जबाबदारी दिली आहे. सध्या भारत सरकारच्या या कंपनीला बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करताना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. मुंबई अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावेल. यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असतील. मात्र त्यासाठी हजारो हेक्टर जमिनीचं अधिग्रहण करावं लागणार आहे. आतापर्यंत जपानच्या कंपनीने केवळ 125 कोटी रुपयांचा पुरवठा केला आहे. भारत आणि जपानमध्ये झालेल्या करारानुसार बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करण्याचं टार्गेट आहे. मात्र आता या प्रकल्पाला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. संबंधित बातम्या  बुलेट ट्रेनचं भूमिपूजन, नेमकी कशी असेल पहिली बुलेट ट्रेन?   स्पेशल रिपोर्ट: बुलेट ट्रेनमुळे मुंबईचं महत्त्व कमी होणार?   बुलेट ट्रेन ते गिफ्ट सिटी... मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकारचा डाव?   भारताची पहिली बुलेट ट्रेन गुजरातमध्येच धावणार? 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget