jammu- kashmir : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकातील मैसूमा परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. मैसूमा परिसरासह दहशतवाद्यांनी आज पुलवामा येथील लजुरा गावातही हल्ला केला. या हल्ल्यात मुळचे काश्मीरमधील नसलेले दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.
दहशतवाद्यांनी आज सकाळी प्रथम श्रीनगर जिल्ह्यातील मैसुमा परिसरात सीआपीएफच्या जवानांवर गोळीबार केला. त्यामध्ये एक जवान शहीद झाला तर दोन जवान जखमी झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी पुलवामाच्या लाजुरा गावात हल्ला केला. यात दोघे जण जखमी झाले. लष्कराने त्यांना तत्काळ उपचासाराठी रूग्णालयात दाखल केले. दोन्ही ठिकाणी हल्ला झाल्यानंतर लष्कराने नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी झालेले जवान लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो."
दरम्यान, सुरक्षा दलांनी आज जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ एका गावात दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. पूंछ जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नूरकोट गावात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान हे दहशतवाद्यांचे ठिकाण सापडले. लष्काराने जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांमध्ये दोन मॅगझिन आणि 63 राउंडसह दोन एके-47 रायफल, 223 बोअरची एके आकाराची बंदूक, त्याची दोन मॅगझिन आणि 20 राउंडसह एक चिनी पिस्तूलाचा समावेश आहे, अशी माहिती लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी अड्ड्याचा पर्दाफाश, दोन AK-47 रायफल जप्त
- नागालँड, आसाम आणि मणिपूरमधील AFSPA कायद्याच्या प्रभाव क्षेत्रात घट होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची आता अंमलबजावणी होणार 'FASTER'! तुरुंग-तपास यंत्रणेपर्यंत लवकर पोहोचणार आदेश