Congress Meeting : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. या शेवटच्या आठवड्यात कोणत्या मुद्यावर चर्चा करायची, कोणत्या मुद्यावरुन सरकारला घेरायचे यासंदर्भात विरोधक रणनिती आखणार आहेत. सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसच्या संसदीय दलाची उद्या (5 एप्रिल) बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यातील रणनितीवर चर्चा करण्यासाठी उद्या काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सकाळी साडेनऊ वाजता बैठक होणार आहे.  काँग्रेसची ही बैठक अशा वेळी होत आहे की, जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये दिल्ली महानगरपालिका दुरुस्ती विधेयक आणि फौजदारी प्रक्रिया विधेयकासह 7 विधेयके सादर करण्यात आली आहेत. लोकसभेने  7 पैकी 6 विधेयके आधीच मंजूर केली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस शेवटच्या आठवड्यात आपल्या रणनितीवर चर्चा करणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींबाबत काँग्रेस संसदेत असो की बाहेर, केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. 


या दोन राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार 


दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पाचपैकी हाती असलेलं पंजाब हे राज्य देखील काँग्रेसच्या हातून निसटले आहे. तर बाकीच्या राज्यात देखील काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागले आहे. त्यामुळं या पाच राज्यातील निवडणुकीतील पराभवानंतर संसदीय पक्षाची बैठकही काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जात आहे. तसेच यावर्षी हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकी संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या पाच राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या पाचपैकी फक्त राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत आहे, तर झारखंड, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांसह काँग्रेस सत्तेत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: