एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद, एकाच दिवशी दोन ठिकाणी हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये (jammu- kashmir) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांनी आज जम्मू- काश्मीरमध्ये दोन ठिकाणी हल्ला केला आहे.    

jammu- kashmir : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकातील मैसूमा परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले आहेत. मैसूमा परिसरासह दहशतवाद्यांनी आज पुलवामा येथील लजुरा गावातही हल्ला केला. या हल्ल्यात मुळचे काश्मीरमधील नसलेले दोन नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. 

दहशतवाद्यांनी आज सकाळी प्रथम श्रीनगर जिल्ह्यातील मैसुमा परिसरात सीआपीएफच्या जवानांवर गोळीबार केला. त्यामध्ये एक जवान शहीद झाला तर दोन जवान जखमी झाले. त्यानंतर दहशतवाद्यांनी  पुलवामाच्या लाजुरा गावात हल्ला केला. यात दोघे जण जखमी झाले. लष्कराने त्यांना तत्काळ उपचासाराठी रूग्णालयात दाखल केले. दोन्ही ठिकाणी हल्ला झाल्यानंतर लष्कराने नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.     

हा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, "कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी झालेले जवान लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो."
  
दरम्यान, सुरक्षा दलांनी आज जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ एका गावात दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला आहे. पूंछ जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नूरकोट गावात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान हे दहशतवाद्यांचे ठिकाण सापडले. लष्काराने जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यांमध्ये दोन मॅगझिन आणि 63 राउंडसह दोन एके-47 रायफल, 223 बोअरची एके आकाराची बंदूक, त्याची दोन मॅगझिन आणि 20 राउंडसह एक चिनी पिस्तूलाचा समावेश आहे, अशी माहिती लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिली आहे.  

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
PM Modi Meeting with Shiv Sena MPs: पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...

Embed widget