Encounter in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या (Jammu kashmir) शोपियानमधील द्रास भागात मंगळवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यावर सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. काश्मीर झोन पोलिसांनी चकमक सुरू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोपियांच्या द्राचमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. दरम्यान, अमित शहा (Amit Shah) श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही तासांनी ही चकमक झाली असल्याचं जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले. 


अमित शहा श्रीनगरला पोहोचल्यानंतर चकमक - काश्मीर पोलीस


जम्मू काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने संशयित जागेला वेढा घातताच तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अमित शहा श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही तासांनी ही चकमक झाली. त्याआधी त्यांनी राजौरी येथे जाहीर सभेला संबोधित केले होते. अशी


सुरक्षा दलांना मोठे यश, दहशतवाद्यांचा खात्मा


यापूर्वी सप्टेंबर महिन्यात काश्मीर खोऱ्यात झालेल्या चकमकीत 2 घुसखोर आणि 14 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. त्यात एक पाकिस्तानी दहशतवादीही होता. यापैकी दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बास्कुचन आणि चित्रगाम गावात झालेल्या दोन चकमकीत दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये 3, अनंतनाग आणि कुलगाममध्ये प्रत्येकी 2 आणि श्रीनगर, बारामुल्ला आणि कुपवाडा येथे प्रत्येकी एक चकमक झाली. कुपवाड्यात दोन दहशतवादी मारले गेले.


दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू


जम्मू काश्मीरमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील द्राच भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला तेव्हा शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics Shivsena: महाराष्ट्राला मोडून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? शिवसेनेचा शिंदे-भाजपला सवाल


Solar Flare : सूर्यावर पुन्हा स्फोट, NASA ने शेअर केला फोटो, सौरवादळाचा पृथ्वीवरही होणार परिणाम