एक्स्प्लोर

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: या चेहऱ्यांना कधी विसरू नका! पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचे फोटो समोर

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आला आहे. पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) या ठिकाणी  पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आला आहे. पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. चौघेही पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून हा कट रचला जात होता. पाकिस्तानातून हे हल्लेखोर त्या ठिकाणी आले होते, त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने या हल्लेखोरांनी हल्ले केले. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांच्या चेहरा दिसणारा हा पहिला फोटो समोर आला आहे. काश्मिरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. हल्लेखोरांचा हा फोटो समोर आल्याचं दिसून येत आहे. 

पोलिसांनी दहशतवाद्यांचे रेखाचित्र केले जारी 

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र देखील पोलिसांनी जारी केले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पिडित पर्यटकांशी बोलून ही रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. त्या दहशतवाद्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तीन हल्लेखोरांचे स्केच बनवण्यात आलेले आहे. हा हल्ला 7 ते 8 जणांनी हल्ला केल्याची माहिती आहे. मात्र, त्यापैकी तिघांचे स्केच बनवण्यात आले आहेत. हे 3 दहशतवादी आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलह यांची रेखाचित्रे आहेत. त्यांचा कसून तपास घेतला जात आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. यादरम्यानच पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशदवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्व लष्करी तुकड्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान, तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र समोर आले आहेत आणि त्यांची नावेही उघड झाली आहेत. पहलगाममध्ये आदिल, आसिफ, सुलेमान यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत दोन स्थानिक दहशतवादीही सहभागी असल्याचे वृत्त आहे. सध्या, मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू आहे, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला, तिथे नेहमीच सुरक्षा दलांची संख्या कमी राहिली आहे, तिथे कधीही कडक सुरक्षा व्यवस्था दिसली नाही. याचाच फायदा घेत दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रातील मृतांची नावे

1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4)  संतोष जगदाळे- पुणे
5)  कौस्तुभ गणबोटे- पुणे
6)   दिलीप देसले- पनवेल

जखमींची नावे

1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget