Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोहीत तीव्र, सहा महिन्यात 100 दहशतवाद्यांचा खात्मा
Jammu Kashmir : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. काही सामान्य नागरिकांसह मजूर आणि सराकरी नोकरदारांच्या दहशतवाद्यांनी हत्या केल्या आहेत.
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. या वर्षात आतापर्यंत लष्कराने 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, अशी माहिती जम्मू-काश्नीरचे आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी दिली आहे.
जम्मू-काश्मीरमधील क्रिस्बल पालपोरा संगम भागात पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, गांदरबलचा दहशतवादी आदिल परे चकमकीत मारला गेला आहे. काश्मीर पोलिसांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये काल रात्री सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी येथे तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी संघटना लष्कर-ए तैयबा (LeT) शी संबंधित होते. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. तिन्ही दहशतवादी स्थानिक होते. यातील एका दहशतवाद्याचे नाव जुनैद शेरगोजरी असे असून तो जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस अधिकारी रियाझ अहमद ठोकर यांच्या हत्येमध्ये सामील होता. लष्कर-ए तैयबाचा आणखी एक दहशतवादी आज मारला गेला. या वर्षात आतापर्यंत 100 दहशतवादी मारले गेले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. काही सामान्य नागरिकांसह मजूर आणि सराकरी नोकरदारांच्या दहशतवाद्यांनी हत्या केल्या आहेत. या महिन्यात दशतवाद्यांनी एका टीव्ही अभिनेची देखील हत्या केली आहे. तर गेल्या महिनाभरत जवळपास नऊ काश्मिरी पंडितांच्या दहशतवाद्यांनी हत्या केल्या आहेत.
काल ठार करण्यात आलेल्या एका दहशतवाद्याचं नाव जुनैद शेरगोजरी असून तो जम्मू-काश्मीरचे विशेष पोलीस अधिकारी रियाझ अहमद ठोकर यांच्या हत्येमध्ये सामील होता. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या चकमकीत ठार झालेल्या अन्य दोन दहशतवाद्यांची नावं फाजील नजीर भट आणि इरफान अह मलिक अशी आहेत. हे पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल आणि एक पिस्तूल, दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून शोध कार्य सुरू आहे.