एक्स्प्लोर

AK-47सह बेपत्ता पोलिस अधिकारी हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सामील!

जम्मू-काश्मीर पोलिसांकडून एसपीओ इरफान अहमदचा शोध घेण्यासाठी परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु होतं.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामामधून शस्त्रासह बेपत्ता झालेला एका पोलिस अधिकारी  हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. इरफान अहमद असं या विशेष पोलिस अधिकाऱ्याचं (एसपीओ) नाव आहे. एसपीओ इरफान अहमद हा पम्पोर पोलिस स्टेशनचे एसएचओच्या सुरक्षेत तैनात होता आणि सकाळपासून एके-47 या रायफलसह बेपत्ता होता. पुलवामाच्या लुलीपोरा नेवाजवळ त्याचं शेवटचं लोकेशन होतं. पुलवामाच्या नेहामा काकापोराचा रहिवासी असलेला इरफान अहमद बेपत्ता झाल्याची माहिती पम्पोर पोलिस स्टेशनला आज (बुधवार) सकाळी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. इरफान अहमद गायब होताच तो कोणत्यातरी दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची कुणकुण पोलिस अधिकाऱ्यांना लागली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून एसपीओ इरफान अहमदचा शोध घेण्यासाठी परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु होतं. मात्र याच दरम्यान फरार एसपीओ इरफान अहमद आमच्या संघटनेत सामील झाल्याचा दावा हिजबुल मुजाहिद्दीनने केला. याआधी 24 एप्रिल रोजी जम्मू काश्मीर पोलिसातील एक शिपाई तारिक अहमद पखेरपोरा बडगाम जिल्ह्यातून आपल्या एके-47 रायफल आणि दारुगोळ्यासह बेपत्ता झाला होता. तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दक्षिण काश्मीरमधून बेपत्ता झालेला सैन्याचा एक जवान इदरीस मीर देखील हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचं समोर आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

मणिपूर भेसळयुक्त दारु प्रकरण! मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, तर 600 जणांवर उपचार सुरु 
मणिपूर भेसळयुक्त दारु प्रकरण! मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, तर 600 जणांवर उपचार सुरु 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 
सोनं खरेदी करावं की नको? 9 दिवसात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण, नेमकी काय आहेत कारणं? 
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget