एक्स्प्लोर

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळाचा तडाखा; नद्यांच्या प्रवाहात अडथळे, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल

Jammu Kashmir Avalanche : जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. हिमस्खलनामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.

Jammu Kashmir Heavy Snowfall : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) होत आहे. येथे हिमवादळाचा जोरदार फटका बसत आहे. गुरेजमधील तुलेल परिसरातील दोन गावांमध्ये हिमस्खलन झालं आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमस्खलनामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. गुरेज सेक्टकमध्ये शुक्रवारी हिमस्खलन झाल्यामुळे नद्द्यांच्या किशनगंगा नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे या परिसरात जलसंकट निर्माण झालं आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत आहेत.

हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

काश्मीर खोऱ्यात यंदाच्या मोसमातील मोठी बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. जम्मू-काश्मीरच्या गुरेझमधील तुलेल परिसरात हिमवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. येथील दोन गावांमध्ये हिमस्खलन झाले आहे. या हिमस्खलनामुळे किशनगंगा नदीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. हिमस्खलनामुळे येथील विजिर्थल आणि नीरू गावात पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगरान तुलेलमध्ये हिमस्खलनामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाकडून या  या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन केलं आहे. हवामान सुधारेपर्यंत प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्यास आणि किशनगंगा, पर्वत किंवा हिमस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितलं आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्येही बर्फवृष्टी

पर्वतीय प्रदेशांमध्ये हिमवर्षाव सुरुच आहे. जम्मू आणि काश्मीरसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही सतत बर्फवृष्टी सुरु आहे. हिमाचल प्रदेशातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे. हिमवृष्टीनंतर हिमाचल प्रदेशमधील 208 रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.

बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहेब, रुद्रनाथ, नंदा घुंघटी, लाल माटी या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बर्फवर्षाव सुरु आहे. सखल भागात अजूनही हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर दुसरीकडे बर्फवृष्टीमुळे गंगोत्री धाममधील मंदिर पूर्णपणे झाकलं गेले आहे. बर्फवृष्टीमुळे यमुनोत्री महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बर्फ हटवण्याचे काम सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget