Humayun Bhat Killed In Anantnag Encounter : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे उप अधीक्षक (डीएसपी) शहीद झाले. तर, दोन सैनिक बेपत्ता आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातील गरोल भागात बुधवारी सकाळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्यांमध्ये 19 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीएसपी हुमायून भट्ट यांचा समावेश आहे. भट्ट यांचे वडीलही पोलीस अधिकारी होते.
कोण आहे हुमायून भट्ट?
वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हुमायून भट्ट यांना दोन महिन्यांची मुलगी आहे. भट्ट यांचे वडील गुलाम हसन भट्ट हे जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त महानिरीक्षक (आयजी) आहेत.
काय म्हणाले DGP दिलबाग सिंह?
पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या वतीने हुमायून भट्ट यांच्या हौतात्म्याबद्दल आणि इतर जवानांच्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे निवृत्त आयजी गुलाम हसन भट्ट यांचे पुत्र डीएसपी हुमायून भट्ट यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे."
ही कारवाई मंगळवारी सुरू झाली
अधिका-यांनी सांगितले की, गारोल भागात दहशतवाद्यांविरोधातील कारवाई मंगळवारी संध्याकाळी सुरू झाली होती. मात्र, ती रात्री थांबवण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी पुन्हा त्यांचा (दहशतवाद्यांचा) शोध सुरू करण्यात आला.
आपल्या टीमचे नेतृत्व करत कर्नल सिंग यांनी दहशतवाद्यांवर हल्ला केला. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. 12 वी शीख लाइट इन्फंट्री (LI) च्या कर्नल सिंग यांनाही सेना पदक प्रदान करण्यात आले. धोनक हे 15 व्या शीख एलआयमधील होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, धोनक आणि भट यांनाही गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा एक दिवसापूर्वी जम्मू प्रदेशातील राजौरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर लष्कराच्या सहा वर्षीय महिला लॅब्राडोरनेही आपल्या 'हँडलर'ला वाचवताना आपला जीव गमावला होता.
महत्त्वाच्या बातम्या :