14th September In History : आजचा दिवस हा भारताच्या इतिहासातसाठी महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी संविधान सभेने हिंदी या देवनागरी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा दिला. तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांना हिंदीमधून संबोधित केलं. 


जाणून घेऊया आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घटना, 


1901 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकेन्झी यांची गोळ्या झाडून हत्या  


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकेन्झी यांची 14 सप्टेंबर 1901 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 


1917 : समाजवादी क्रांतीनंतर रशिया प्रजासत्ताक राष्ट्र घोषित 


लेनिनच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत रशियामध्ये समाजवादी क्रांती झाली आणि त्या ठिकाणची राजेशाही संपली. 14 सप्टेंबर 1917 रोजी सोव्हिएत रशियाने स्वतःला प्रजासत्ताक देश घोषित केला. रशियन क्रांती हा रशियन साम्राज्यातील राजकीय आणि सामाजिक बदलांचा काळ होता, जो 1917 मध्ये सुरू झाला. या काळात रशियाने सलग दोन क्रांती आणि रक्तरंजित गृहयुद्धानंतर आपली राजेशाही संपुष्टात आणली आणि सरकारचे समाजवादी स्वरूप स्वीकारले. पहिल्या महायुद्धादरम्यान किंवा नंतर झालेल्या इतर युरोपीय क्रांतींचे अग्रदूत म्हणूनही रशियन क्रांतीकडे पाहिले जाऊ शकते. 


1949 : संविधान सभेने हिंदीला भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा 


संविधान सभेने (Constitution Assembly) आजच्याच दिवशी म्हणजे 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन (Hindi Divas) म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर 14 सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिला अधिकृत हिंदी दिवस 14 सप्टेंबर 1953 रोजी साजरा करण्यात आला.


1959 : सोव्हिएत युनियनचे अंतराळयान प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले


चंद्रावर उतरणारे जगातील पहिले अंतराळ यान लुना-2 हे होते. या अंतराळ यानाने 14 सप्टेंबर 1959 रोजी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला होता. त्याला लुनिक-2 असेही म्हणतात. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाला मोठ्या प्रयत्नांनंतर हे यश मिळाले. सोव्हिएत युनियनच्या लुना प्रकल्पांतर्गत प्रक्षेपित केलेले हे दुसरे अंतराळयान होते. चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचणारी लुना-2 ही पहिली मानवनिर्मित वस्तू असल्याचे मानले जाते. 


1960 : खनिज तेल उत्पादक देशांकडून ओपेकची स्थापना 


ओपेक (OPEC) ही 13 पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना आहे. सौदी अरेबिया, अल्जेरिया, इराण, इराक, कुवेत, अंगोला, संयुक्त अरब अमिराती, नायजेरिया, लिबिया आणि व्हेनेझुएला, गॅबॉन, गिनी, काँगो. हे देश औपेकचे सदस्य देश आहेत. 14 सप्टेंबर 1960 रोजी या सर्व देशांनी एकत्र येत ओपेकची स्थापना केली. 


2000 : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अमेरिकन सिनेटच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले.


2008 : रशियातील पर्म विमानतळावर एरोफ्लॉट विमान कोसळले. विमानातील सर्व 88 जणांचा मृत्यू झाला.


रशियातील पर्म विमानतळावर 14 सप्टेंबर 2008 रोजी एरोफ्लॉट विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व 88 जणांचा मृत्यू झाला होता. 


2009 : भारताच्या लिएंडर पेस आणि चेक गणराज्यच्या लुकास लोही यांनी महेश भूपती आणि मार्क नोल्स या जोडीचा पराभव केला.