एक्स्प्लोर

Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Kulgam Encounter:जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये आज सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यापैकी एका चकमकीत द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचा कमांडर अफाक सिकंदर ठार झाला. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ही माहिती दिली. 

कुलगाममधील पुंबई आणि गोपालपोरा गावात ही चकमक झाली होती. दोन्ही ठिकाणी अजूनही चकमक सुरूच आहे. श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये 15 नोव्हेंबरला सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या वर्षात आतापर्यंत 135 हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. 38 विदेशींसह 150-200 दहशतवादी अजूनही काश्मीर खोऱ्यात सक्रिय आहेत.

जम्मू काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या विरोधात  सुरक्षा दलाने मोठी मोहिम हाती घेतली आहे. आज देखील दक्षिण काश्मीरचे पुलवामा जिल्ह्यात लष्कर ए तोयबा दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आईईडी ताब्यात घेण्यात आले आहे.  ऑक्टोबर महिन्यात दहशतवादी हल्ल्यात तब्बल 12 जवान शहिद झाले तर 13 नागरिकांची हत्या करण्यात आली. यामध्ये व्यावसायिक, कामगार आणि शिक्षकांचा समावेश आहे. तर जवानांनी 20 दहशतवाद्यांची हत्या केली. 

जम्मू काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसात दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. 8 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एक सेल्समनची हत्या केली. त्यापूर्वी एक दिवस अगोदर 7 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी एका कॉन्स्टेबलची होळी मारुन हत्या केली. तर ऑक्टोबर महिन्यात 13 नागरिकांची हत्या करण्यात आली. यामध्ये बिझनेसमॅन, कामगार आणि शिक्षकांचा सहभाग आहे. तर ऑक्टोबर महिन्यात 12 जवान देखील शहीद झाले.  तर सुरक्षा दलाने 20 दहशतवाद्यांना ठार केले. 

अलिकडच्या काही घटनांवरुन असं लक्षात येतंय की पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांनी लक्ष्य केलं आहे, त्यांना ठार मारलं जात आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या ठिकाणी 25 काश्मिरी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

Srinagar Encounter : श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu Kashmir News: जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून सेल्समनची हत्या, 24 तासातील दुसरी घटना

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget