Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) शोपियानमध्ये (Shopian) दहशतवादी इम्रान बशीर गनी (Imran Ghani)  ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुसऱ्या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यादरम्यान दुसऱ्या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला.


 




दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकीत इम्रानचा मृत्यू


जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर ग्रेनेड फेकणारा दहशतवादी इम्रान बशीर गनी याला जिवंत पकडण्यात आले होते, त्यानंतर त्याने केलेल्या खुलाशांच्या आधारे छापेमारी करण्यात येत होती. त्या दरम्यान, शोपियानच्या नौगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. आणि इम्रान याचा मृत्यू झाला


शोपियानमध्ये दोन मजुरांवर ग्रेनेडने केला होता हल्ला 
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात उत्तर प्रदेशातील दोन मजूर ठार झाले. दोघेही राज्यातील कन्नौज जिल्ह्यातील रहिवासी होते. काश्मीर पोलिसांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये करत माहिती दिली होती की, 'दहशतवाद्यांनी हरमन येथे ग्रेनेड फेकले, ज्यात यूपीचे दोन मजूर मनीष कुमार आणि राम सागर जखमी झाले. रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. दोघेही कन्नौजचे रहिवासी होते. यावेळी परिसराची नाकेबंदी करण्यात आली. माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शोपियानमध्ये एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्याही करण्यात आली होती.


ग्रेनेड फेकणाऱ्या दहशतवाद्याला अटक
आणखी एका ट्विटमध्ये काश्मीर पोलिसांनी सांगितले की, ग्रेनेड फेकणाऱ्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, 'शोपियान पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव इम्रान बशीर गनी असून तो दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा हायब्रीड दहशतवादी आहे. याचा पुढील तपास आणि छापेमारी सुरू आहे.


15 ऑक्टोबरला काश्मिरी पंडितवर गोळी झाडली
15 ऑक्टोबर रोजी दक्षिण काश्मीर जिल्ह्यात राहणारे काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट यांची त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. काश्मिरी पंडित संघर्ष समिती (KPSS), काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना, त्यांच्या अधिकृत हँडलवरून शोपियानमध्ये आणखी एका काश्मिरी प्रवासी मरण पावल्याची माहिती दिली होती