Milk Price : देशातील विविध राज्यात लम्पी स्कीन आजार (lumpy skin disease) पसरला आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. लम्पी आजारामुळं पशुधन कमी झाल्यानं दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं जानेवारी ते मार्चदरम्यान दुधाचे दर (Milk Price) आणखी वाढण्याची शक्यता आहे. या काळात दूध दरात 5 ते 6 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.


लम्पी आजारासह चाऱ्याची टंचाई


ऐन दिवाळीच्या तोंडावर दुधाच्या दरात वाढ झाली आहे. हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं निरीक्षण इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी नोंदवलं आहे. जनावरांना झालेल्या लम्पी आजारामुळं पशुधन कमी झालं आहे. तसंच चाऱ्याचीही चंटाई निर्माण झाली आहे. याशिवाय यावेळी दूध पावडरचं उत्पादनही घटलं आहे. त्यामुळं जानेवारीनंतर दूध संकलन कमी झाल्यानंतर मागणीप्रमाणं पुरवठा होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळं दुधाचे दर प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज आहे.


देशभरातील दूध संघांनी दुधाचे दर वाढवले


देशात जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाचे दर आणखी वाढणार आहेत. कारण जानेवारी ते मार्चमध्ये देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं मत इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केले. याचे मुख्य कारण म्हणजे जनावरांचा लम्पी आजार. या रोगामुळे पशुधन कमी झालं आहे. दूध संघ जादाची दूध पावडर करून ठेवत असतात. मात्र, यंदा तसं  होत नाही. त्यामुळं, उन्हाळ्यात ज्या वेळी दूध संकलन कमी होतं, त्यावेळी पावडरचा वापर करुन मागणी पूर्ण केली जाते. पण यंदा हा समतोल राखणं कठीण होणार आहे. आताच्या घडीला अमूलसह देशभरातील दूध संघांनी दूधाचे दर वाढवले आहेत. हे दर आणखी पाच ते सहा रुपये प्रतिलिटर वाढू शकतात, असा अंदाज आहे.


अमूल कंपनीनं दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ


ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. अमूल कंपनीनं दूधाच्या (Amul Milk) दरांत प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. आता एक लिटर फुल क्रीम दुधाचा (Amul Full Cream Milk) दर 63 रुपये प्रति लिटर झाला आहे. सणासुदीपूर्वी आधीच महागाईनं जनता होरपळली आहे. अशातच आता दूधाच्या दरांत झालेल्या वाढीनं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसणार आहे. यापूर्वीही अमूलनं दूधाच्या दरांत वाढ केली होती. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं (Gujarat Cooperative Milk Marketing Federation) आपल्या फुल क्रीम दुधाच्या प्रति लिटर किमतींत 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीपूर्वी दुधाचे दर 61 रुपये प्रति लिटर होते. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतंही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही.


महत्त्वाच्या बातम्या:


दिवाळीपूर्वी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक झटका; अमूल दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं