Jammu Kashmir : काश्मीरमध्ये अनेक दिवसांपासून दहशतवादी पोलीस कर्मचारी आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. ज्यामध्ये अनेक वेळा सुरक्षा साधनांच्या कमतरतेमुळे देशाचे शूर सैनिक गंभीर जखमी होऊन शहीदही होतात. अशा परिस्थितीत जम्मू-काश्मीर सरकारने पोलिसांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे.


20,000 हून अधिक बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेडगियर खरेदी करण्याचा निर्णय


जम्मू आणि काश्मीर सरकारने सुरक्षा उपाय म्हणून पोलिसांसाठी 20,000 हून अधिक बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेडगियर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रशासित प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस सुरक्षेसोबतच पोलीस कर्मचारी 11,900 बुलेटप्रूफ हेडगियर आणि 8,200 जॅकेट खरेदी करतील.


दहशतवादविरोधी कारवायांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांच्या वाढत्या मृत्यूमुळे हा निर्णय


गृह विभागाच्या अधिकार्‍यांच्या मते, जम्मू आणि काश्मीर पोलिस मुख्यालयाने अलीकडेच बुलेटप्रूफ जॅकेट, हेडगियर, वाहने, चष्मा आणि पोडियमसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सहा ई-निविदा जारी केल्या आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट लहान, मध्यम आणि मोठ्या अशा तीन श्रेणींमध्ये आहेत आणि एकूण 11,900 बुलेटप्रूफ हेडगियरपैकी 4,900 J&K पोलिसांना आणि 7,000 CRPF जवानांना दिले जातील.


सहा ई-निविदा जारी


याशिवाय जम्मू काश्मीर पोलीसांना 20 बुलेटप्रूफ पोडियम, 281 बुलेटप्रूफ ग्लासेस, 2 बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ वाहने आणि 15 बुलेटप्रूफ मार्क्समन वाहने देखील खरेदी करतील. सहाय्यक महानिरीक्षक, तरतुदी आणि वाहतूक, पोलीस मुख्यालयाच्या म्हणण्यानुसार, या सुरक्षा वस्तूंच्या पुरवठ्यासाठीच्या निविदा मूळ उत्पादक किंवा त्यांच्या अधिकृत डीलर्सकडून घेण्यात आल्या आहेत.


दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाकडून मोठे ऑपरेशन


जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाकडून मोठे ऑपरेशन सुरू आहे. शनिवारी अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी कमांडर ठार झाला आहे. तर कुलगाममधील दुसऱ्या कारवाईत दहशतवादी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत माहिती देताना आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, रेडवानी बाला कुलगाम येथील रहिवासी असलेला लष्कर-ए-तैयबाचा कमांडर निसार अहमद दार कुलगाम येथील सिरहामा येथे मारला गेला आहे. कुलगाम परिसरातील अनेक गुन्ह्यांमध्ये आणि हत्यांमध्ये त्याचा सहभाग होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


UGC इंडियाचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक; हॅकर्सनी केले NFT ट्रेडिंग संदर्भात ट्वीट


Jammu-Kashmir : अनंतनाग चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार, दोन जवान जखमी