UGC India Official Twitter Account Hacked : विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. UGC इंडियाच्या ट्विटर हँडलचा डीपी आणि बॅकग्राउंडचा फोटो बदलण्यासोबतच, हॅकर्सनी शेकडो ट्विटर युजर्सना टॅग करत एकापाठोपाठ एक ट्वीट केले. अकाउंट हॅक करणाऱ्याने एक ट्वीट पिन देखील केलं, ज्यामध्ये लिहिलं होतं की, "Beanz अधिकृत संग्रहणाच्या प्रकटीकरणाच्या स्मरणार्थ, आम्ही समुदायातील सर्व सक्रिय NFT व्यापार्‍यांसाठी पुढील 24 तासांसाठी एक एअरड्रॉप उघडला आहे. आपल्या Beanz चा दावा करा. गार्डनमध्ये तुमचं स्वागत आहे."


दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील एकमेव अनुदान देणारी संस्था आहे. यूजीसीकडे प्रामुख्यानं दोन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, ज्यात निधी उपलब्ध करून देणं आणि देशातील उच्च शिक्षणाच्या दर्जाचं समन्वय, निश्चय आणि देखभाल करणं यांचा समावेश आहे.


दोन दिवसांपासून हॅकर्सच्या निशाण्यावर देशातील प्रतिष्ठित संस्था 


गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक नामांकित संस्था हॉकर्सच्या निशाण्यावर आहेत. याआधी शनिवारी हवामान खात्याचं ट्विटर हँडल हॅकर्सनी 24 तासांपेक्षा जास्त काळासाठी हॅक केलं होतं. अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सनी त्यावर NFT ट्रेडिंग सुरू केलं. या अकाउंटवरही एक ट्वीट पीन करण्यात आलं होतं. हे ट्वीट एनएफटी (NFT) ट्रेडिंगशी निगडीत होतं. सर्वात आधी या अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलण्यात आला होता. परंतु, त्यानंतर फोटो हटवण्यात आला होता. हवामान विभागाला अकाउंट हॅकर्सच्या तावडीतून काढून सुरक्षित करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागला होता. 


यापूर्वी शुक्रवारी रात्री उशीरा उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं होतं. हे अकाउंट जवळपास 29 मिनिटांसाठी हॅक करण्यात आलं होतं. या दरम्यान हॅकर्सनी अकाउंटवरील अनेक ट्वीट डिलीट केले होते. त्यानंतर अकाउंट हॅकर्सच्या तावडीतून सोडवून सुरक्षित करण्यात आलं. पुढच्या दिवशी शनिवारी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha