Jahangirpuri Demolition : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. एच ब्लॉकमध्ये अनेक बांधकामं हटवण्यात आली असून सध्या तोडक कारवाईला कोणताही विरोध झालेला नाही. दिल्लीत हनुमान जयंती दिवशी झालेल्या दगडफेक आणि तोडफोड प्रकरणात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. सध्या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. त्यानंतर आता पालिकेने अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून घटनास्थळी 400 पोलीस कर्मचारी तैनात आहेत.


या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. दरम्यान,  मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर या प्रकरणातील घडामोडी वाढल्या. उत्तर दिल्ली महानगरपालिकेने जारी केलेल्या निर्देशात म्हटलं आहे की, पालिकेकडून 20 आणि 21 एप्रिल रोजी दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात बेकायदेशीर बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात येईल. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलिसांचे 400 कर्मचारी घटनास्थळी तैनात आहेत.






सकाळपासूनच नागरिकांकडून सामान हलवण्यास सुरुवात
एमएसडी आज या भागातील बेकायदा बांधकामे पाडण्याची कारवाई करणार आहे. यावरून परिसरात तणावाचे वातावरण आहे. जहांगीरपुरी, कुशल सिनेमा चौक समोर सीडी पार्क झोपडपट्टीच्या बाहेर अनेक अवैध बांधकामं आहेत. ही बेकायदा बांधकामे आज हटविण्यात येणार असल्याचे समजताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. सर्वांनी आपले सामान तिथून काढायला सुरुवात केली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha