Bulli Bai Case : बुली बाई अ‍ॅप (Bulli Bai App) प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने सांगितलं की, 'या तरुण आरोपींच्या अजाणतेपणा दुरुपयोग इतर आरोपींकडून करण्यात आला.' वांद्रे न्यायालयाचे न्यायाधीश के. सी. राजपूत यांनी 12 एप्रिलला आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक अग्रवाल यांचा जामीन मंजूर केला आहे. तर आरोपी नीरज बिश्नोई, ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज सिंह यांचा जामीन अर्ज फेटाळला. या संदर्भातील सविस्तर आदेश मंगळवारी उपलब्ध करून देण्यात आला. 


न्यायालयाने जामिनावर सुटलेल्या आरोपींच्या पालकांना शक्य असल्यास त्यांच्या मुलांना सामाजिक वर्तन आणि सोशल मीडियाचा योग्य वापराचे नियम शिकवण्यासाठी समुपदेशन करण्यास सांगितलं आहे. यापूर्वी मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि सेशन कोर्टाने या सर्वांना जामीन नाकारला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपींनी नव्याने याचिका दाखल केली होती.


आरोपी नीरज बिश्नोई, ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज सिंह यांनी हे प्रकरणातील मुख्य सुत्रधार आहेत. त्यांनी अ‍ॅप तयार करणे आणि अपलोड करणे आणि माहिती प्रसरवण्याचे काम केले होते, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं सांगितलं की, आरोपी विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक अग्रवाल हे तरुण आरोपींनी इतर आरोपींचे अनुसरण करत होते. त्यामुळे याप्रकरणात विशाल, श्वेता आणि मयंक यांची भूमिका बिश्नोई, ठाकूर आणि नीरज सिंह यांच्यापेक्षा कमी असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.


न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, बिश्नोई, ठाकूर आणि नीरज हे वयाने प्रौढ असून त्यांना समज होती, तरीही त्यांनी तीन तरुणांच्या अज्ञानाचा गैरवापर केला. विशाल, श्वेता आणि मयंक यांच्या परीक्षाजवळ आल्या असून त्यांना तुरुंगात ठेवल्यास त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे तिघांवर लावण्यात आलेले आरोप आणि त्यांचे वय लक्षात घेता त्यांची भूमिका कमी गंभीर असल्याने ते जामिनावर सुटण्यास पात्र आहेत.


काय आहे प्रकरण? 
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुली बाई' अ‍ॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं ट्विटरला लिहिलं होतं. कारण 'बुली बाई'शी संबंधित तीन ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अ‍ॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी 'बुली बाई' अ‍ॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अ‍ॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha