एक्स्प्लोर

तामिळनाडूत पुन्हा अम्मा राज, शशीकलाची हकालपट्टी

एआयएडीएमकेने पक्षाचं महासचिवपद रद्द केलं आहे. जयललिता या पक्षाच्या कायमस्वरुपी महासचिव असतील, असा निर्णय एआयएडीएमकेने घेतला आहे.

चेन्नई : एआयएडीएमकेने पक्षाचं महासचिवपद रद्द करुन तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता या कायमस्वरुपी पक्षाच्या महासचिव असतील, असा निर्णय घेतला आहे. या घोषणेसोबतच जयललिता यांच्या निकटवर्तीय शशीकला यांचं पक्षातील अस्तित्व जवळपास संपुष्टात आलं आहे. या निर्णयावर आता मद्रास हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. कोर्टानेच एआयएडीएमकेच्या बैठकीला परवानगी दिली होती. कारण शशीकला समर्थकांनी कोर्टात धाव घेतली होती. एआयएडीएमकेच्या या बैठकीत शशीकला गटाचे 18 आमदार सहभागी झाले नव्हते. एआयएडीएमकेच्या बैठकीला पक्षाच्या 2 हजार सदस्यांनी उपस्थिती लावली. तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांची 11 सदस्यिय समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली. मुख्यमंत्री ई पलानीसामी आणि ओ पन्नीरसेल्वम यांच्या गटांच्या विलीनीकरणावर यानंतर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलं. शशीकलाची पक्षातून हकालपट्टी केली जावी, अशी मागणी पन्नीरसेल्वम गटाची होती. शशीकला यांनी जयललिता यांच्या निधनानंतर पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्रीपद सोडण्यास भाग पाडलं होतं. दोन्ही गटांचं विलीनीकरण झाल्यानंतर पन्नीरसेल्वम उपमुख्यमंत्री असतील, याबाबतही निर्णय घेण्यात आला. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्याकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा केला. शशीकला यांचा भाचा दिनाकरननेही स्टॅलिन यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली. बहुमतासाठी 117 सदस्यांची आवश्यकता आहे. कारण तामिळनाडू विधानसभेत एकूण सदस्य संख्या 234 एवढी आहे. युनायटेड एआयएडीएमकेने 124 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. पलानीसामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांचं सरकार पाडण्यात येईल, असा इशारा दिनाकरन यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर कॅबिनेट मंत्र्यांची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात खांदेपालट होणार, नव्या चेहऱ्यांना संधी?
Amit Shah And Eknath Shinde Meets: ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यांना भेटणार!
NCP Sunetra Pawar: अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
अजित पवारांच्या निधनानंतर 'ती' एक मेजर चूक; बड्या पदाधिकाऱ्याने सुनेत्रा पवारांना विरोधामागील क्रोनोलॉजी सांगितली
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
Pune ATS Raid: पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
पाकिस्तानी गँगस्टर भट्टीच्या संपर्कातील संशयितांवर ATSची कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात धाडसत्र, 45 जणांना उचललं
Embed widget